Swami Vivekanand Death Anniversary : स्वामी विवेकानंदाच्या या विचारांमुळे तरुणांचे आयुष्य होईल अधिक उज्ज्वल !

Swami Vivekanand Quotes : स्वामी विवेकानंद यांना धर्म व अध्यात्म यांच्याबद्दल अधिक ओढ होती.
Swami Vivekanand Death Anniversary
Swami Vivekanand Death AnniversarySaam tv
Published On

Swami Vivekanand Thoughts : स्वामी विवेकानंदाचे विचार आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत. ४ जुलै हा दिवस त्याची पुण्यतिथी म्हणून ओळखला जातो. स्वामी विवेकानंद यांना धर्म व अध्यात्म यांच्याबद्दल अधिक ओढ होती.

तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही स्मरणात आहेत. स्वामी विवेकानंदाचा जन्म बंगालच्या कोलकाता शहरात झाला तर मृत्यू हा बेलूर मठ, हावडा या ठिकाणी झाला. जाणून घेऊया त्यानिमित्त त्याचे प्रेरणादायी विचार ज्यामुळे तरुणांना येईल उत्सफूर्ती.

Swami Vivekanand Death Anniversary
Shravan 2023 Rashifal : या राशींचा सुरु होणार भाग्योदय ! ५९ दिवस पडेल पैशांचा पाऊस, कामातही मिळेल यश

1. स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे (Symptoms) आहेत.

2. अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते .

Swami Vivekanand Death Anniversary
Fitness Habits at Age 30: महिलांनो, वयाच्या 30 व्या वर्षी 'हे' 6 काम कराच; म्हातारपणी दिसाल तरुण !

3. आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे (Child) असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.

4. आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.

5. चांगल्या पुस्तकाविना घर (Home) म्हणजे दुसरे स्मशानच होय.

6. तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.

7. दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातां पेक्षा अधिक उपयुक्त आहे.

Swami Vivekanand Death Anniversary
Adah Sharma : तुझी घायाळ करणारी 'अदा'; अन् नजरेला भिडणार सौंदर्य, कमालच !

8. देशातील दारिद्र व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.

9. धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे. यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.

10. परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो जो अत्यंत शुद्ध अंत:करणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चितपणे मिळत असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com