Til Tikki Recipe : रविवारच्या नाश्त्यात बनवा तिळाची टिक्की, झटपट बनेल; हटके रेसिपी ट्राय करा

Sunday Breakfast Idea : तुम्ही देखील रविवारच्या नाश्त्यात काही हटके ट्राय करायचा प्रयत्न करत असाल तर तिळापासून बनवा टिक्की. शरीराला अधिक ऊब देणारी आणि हटके रेसिपी नक्की ट्राय करुन पाहा.
Til Tikki Recipe
Til Tikki RecipeSaam Tv
Published On

How To Make Tilchi Tikki :

हिवाळा सुरु झाला की, आपण अधिक आरोग्यदायी पदार्थांची चव चाखली जाते. या काळात शरीरात उष्णता टिकून राहाण्यासाठी काही आपण उष्णदायी असणारे पदार्थ खातो. त्यातील एक तीळ.

या काळात तीळाचे (Sesame) नियमित सेवन केल्याने शरीराला फायदा होतो. हिवाळ्यात संक्रांतीच्या काळात तीळाचे लाडू, चिक्की या ऋतूत जास्त खाल्ले जाते. तीळाचा वापर अनेक पदार्थांच्या (Food) सजावटीसाठी देखील केला जातो.

तुम्ही देखील रविवारच्या नाश्त्यात काही हटके ट्राय करायचा प्रयत्न करत असाल तर तिळापासून बनवा टिक्की. शरीराला अधिक ऊब देणारी आणि हटके रेसिपी (Recipes) नक्की ट्राय करुन पाहा.

Til Tikki Recipe
Orange Kheer Recipe : हिवाळ्यात ट्राय करा संत्र्याची खीर, मुलांनाही आवडेल; पाहा रेसिपी
  • 1. साहित्य

  • बटाटा - २ (उकडलेले)

  • तीळ - 1 कप (पांढरे)

  • पनीर - 1 कप (किसलेले)

  • कांदा - 1 (चिरलेला)

  • कोथिंबीर - 1 कप (चिरलेला)

  • काळी मिरी पावडर - 1 टीस्पून

  • चिली फ्लेक्स - 1 टीस्पून

  • मीठ - चवीनुसार

  • तेल - टिक्की तळण्यासाठी

  • चाट मसाला- 1 टीस्पून

Til Tikki Recipe
Gajar Halwa Recipe: न किसता सोप्या ट्रिक्सने बनवा शाही गाजरचा हलवा, पटकन बनेल; पाहा स्वादिष्ट रेसिपी

2. कृती

  • तिळाची टिक्की बनवण्यासाठी आधी बटाटे उकडून सोलून घ्या. नंतर कांदा बारीक चिरुन घ्या.

  • आता एका भांड्यात चिरलेला कांदा, कोथिंबीर, किसलेले चीज आणि वरील सर्व मसाले घालून मिक्स करा. यानंतर त्यात तीळ घाला.

  • बटाटे उकळल्यानंतर दुसऱ्या भांड्यात काढा. नंतर चमच्याच्या मदतीने मॅश करा. त्यात तयार केलेले साहित्य अॅड करा.

  • सर्व साहित्य नीट मिसळून झाल्यावर थोडे तेल घालून टिक्कीचा आकार द्या. त्याचे गोळे तयार करा.

  • नंतर गॅसवर नॉन-स्टिक पॅन गरम करण्यासाठी ठेवा. कढई गरम झाल्यावर तेल घालून टिक्की दोन्ही बाजूंनी हलक्या हाताने तळून घ्या.

  • टिक्की दोन्ही बाजूंनी तळून झाल्यावर ताटात काढून चाट मसाला किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com