Orange Kheer Recipe : हिवाळ्यात ट्राय करा संत्र्याची खीर, मुलांनाही आवडेल; पाहा रेसिपी

Easy Way To Cook Orange Kheer : जर तुम्हाला गोडाचा पदार्थ ट्राय करायचा असेल तर संत्र्याची खीर ट्राय करु शकता. ती कशी बनवायची पाहूया रेसिपी
Orange Kheer Recipe
Orange Kheer RecipeSaam Tv
Published On

How To Make Orange Kheer :

जेवल्यानंतर आपल्या प्रत्येकाला गोडाचा पदार्थ खायचा असतो. नवीन वर्षात अनेकांना गोडाचे पदार्थ न खाण्याचा संकल्प केला असेल. काही नवीन ध्येय देखील ठरवली असतील. पण आम्ही तुम्हाला अशी रेसिपी सांगणार आहोत. जे हेल्दीही असेल आणि टेस्टीही.

संत्री हे फळ आंबट-गोड फळ आहे. संत्रीचा आरोग्याला अनेक प्रकारे फायदा होतो. सध्या हिवाळ्याचा महिना सुरु आहे. या काळात संत्री अधिक प्रमाणात पाहायला मिळतात. अशातच जर तुम्हाला गोडाचा पदार्थ ट्राय करायचा असेल तर संत्र्याची खीर ट्राय करु शकता. ती कशी बनवायची पाहूया रेसिपी (Recipes).

1. साहित्य

  • ५०० ग्रॅम संत्री

  • १ लिटर दूध (Milk)

  • १०० ग्रॅम साखर (Sugar)

  • १०० ग्रॅम मिल्क मेड

  • १०० ग्रॅम ड्रायफ्रुट्स

  • थोडेसे केशर

  • वेलची पावडर

Orange Kheer Recipe
Gajar Halwa Recipe: न किसता सोप्या ट्रिक्सने बनवा शाही गाजरचा हलवा, पटकन बनेल; पाहा स्वादिष्ट रेसिपी

2. कृती

  • संत्र्याची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम दूध चांगले उकळवून घ्या. संत्री सोलून त्याचा गर काढून घ्या.

  • दूध चांगेल आटल्यानंतर त्यात मिल्कमेड आणि मावा घालून पुन्हा उकळवून घ्या.

  • त्यात केशर, साखर आणि वेलची पूड घालून गॅस बंद करा. तयार दूध थंड झाल्यानंतर त्यात संत्र्याचा गर घालून व्यवस्थित एकजीव करावे.

  • भांड्यात खीर घेऊन सर्व्ह करा संत्र्याची खीर

3. संत्रीचे फायदे

संत्र्यामध्ये अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे अनेक संक्रमणापासून वाचण्यास मदत होते. संत्र्यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर अधिक प्रमाणात आढळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com