Summer Special Chutney : उष्माघातापासून बचाव करेल चटपटीत कच्च्या कैरीची आंबट-गोड चटणी, मिनिटांत तयार करा

Best Superfood In Summer : उन्हाच्या वाढत्या पारामुळे आपल्यापैकी अनेकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशातच तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो.
Raw Mango Chutney
Raw Mango ChutneySaam Tv

Raw Mango Chutney :

उन्हाच्या वाढत्या पारामुळे आपल्यापैकी अनेकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशातच तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो.

ताटाच्या डाव्या बाजूला हमखास वाढला जाणारा पदार्थ चटणी किंवा कोशिंबीर. उन्हाळ्यात आपल्याला बाजारात सर्वत्र कैरी पाहायला मिळते. जी आरोग्यासाठी (Health) अतिशय फायदेशीर (Benefits) आहे. ताटाच्या चवीसोबतच ती पोटही थंड ठेवते.

कच्ची कैरी थंड असते. याचे सेवन केल्याने शरीरातील उष्णतेचा दाह कमी होतो. रक्तातील साखर नियंत्रणात राहाते. हे खाल्ल्याने उष्माघातापासून बचाव होतो. तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. हे खाण्याचे फायदे आहेत. जाणून घेऊया कच्च्या कैरीची चटणी बनवण्याची रेसिपी (Recipes)

Raw Mango Chutney
Veg Pulav Recipe : हॉटेलसारखा व्हेज पुलाव घरीच बनवा, रेसिपी पाहा

साहित्य

  • कच्ची कैरी - २

  • पुदिन्याची पाने- 250 ग्रॅम

  • कोथिंबीर - एक टेबलस्पून

  • हिरव्या मिरच्या - ४

  • मीठ - आवश्यकतेनुसार

  • काळे मीठ - चवीनुसार

  • साखर - १ चमचा

  • जिरे - १ चमचा

  • कढीपत्ता

  • तेल

Raw Mango Chutney
Palak Corn Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा हेल्दी आणि टेस्टी पालक कॉर्न चिला, पाहा रेसिपी

कृती

  • सर्वात आधी कच्ची कैरी धुवून किसून घ्या. नंतर हिरव्या मिरच्या बारीक कापा.

  • त्यानंतर १० मिनिटे पुदिना आणि कोथिंबीर पाण्यात भिजत घाला. बारीक चिरून घ्या.

  • किसलेली कच्ची कैरी, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून घ्या.

  • वरुन साखर आणि मीठ घालून मिक्स करा.

  • नंतर फोडणीसाठी एका भांड्यात तेल गरम होऊ द्या. त्यात जीरे आणि कढीपत्ता घालून तयार चटणीला फोडणी द्या. सर्व्ह करा चटपटीत कैरीची आंबट-गोड चटणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com