Palak Corn Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा हेल्दी आणि टेस्टी पालक कॉर्न चिला, पाहा रेसिपी

Morning Breakfast Recipe | Palak Corn Recipe in Marathi: मुलांसाठी रोज नाश्ता काय बनवायचा असा प्रश्न नेहमीच पालकांना पडतो. मुलांना पोहे, उपमा खाऊन कंटाळा आलेला असतो. अशावेळी त्यांना नवीन काहीतरी खाण्याची इच्छा होते.
Palak Corn Chilla Recipe in Marathi
Palak Corn Chilla Recipe in MarathiSaam Tv

How To Make Palak Corn Chilla:

मुलांसाठी रोज नाश्ता काय बनवायचा असा प्रश्न नेहमीच पालकांना पडतो. मुलांना पोहे, उपमा खाऊन कंटाळा आलेला असतो. अशावेळी त्यांना नवीन काहीतरी खाण्याची इच्छा होते.

मुलांना सुट्टी लागली आहे. अशातच त्यांना काय हेल्दी खाऊ घालावे हा रोजचा प्रश्न आहे. आपण नाश्त्यात रवा किंवा बेसनचा चिला अनेकदा बनवला असेल. पण कधी पालक कॉर्न चिला ट्राय केला का?

Palak Corn Chilla Recipe in Marathi
Cucumber Raita Recipe: उन्हाळ्यात शरीराला फायदेशीर ठरेल काकडीचा रायता, रेसिपी पाहा

पालक आणि कॉर्न शरीरासाठी अतिशय फायदेशीर (Benefits) आहे. याचे सेवन केल्याने मुलांचे आरोग्य देखील सुधारते. पालकमध्ये असणारे व्हिटॅमिन मुलांच्या शरीराला पोषण देते. पालक कॉर्न चिला मुलांना खूप आवडेल. कसा बनवायचा पाहूया रेसिपी (Recipes)

1. साहित्य

  • पालक (बारीक चिरलेली) - १ कप

  • उकडलेले कॉर्न - १ कप

  • बेसन -1 कप

  • आले लसूण पेस्ट - 1 टीस्पून

  • बारीक चिरलेला कांदा - अर्धी छोटी वाटी

  • बारीक चिरलेली सिमला मिर्ची - अर्धी छोटी वाटी

  • हिरवी मिरची बारीक चिरलेली - २

  • बारीक चिरलेली कोथिंबीर - अर्धी छोटी वाटी

  • हळद - १ टीस्पून

  • काळी मिरी पावडर- १ टीस्पून

  • जिरे पावडर - १ टीस्पून

  • जिरे - १ टीस्पून

  • हिंग - ¼ टीस्पून

  • मीठ- चवीनुसार

  • तेल - आवश्यकतेनुसार

  • पाणी (Water)- आवश्यकतेनुसार

Palak Corn Chilla Recipe in Marathi
Curd Rice Recipe: उन्हाळ्यात पोटाला द्या गारवा, झटपट बनवा साउथ इंडियन स्टाइल दही बुत्ती

2. कृती

  • सर्वात आधी कॉर्न आणि पालक मिक्सरमध्ये बारीक वाटा. याची बारीक पेस्ट तयार करा.

  • तयार पेस्टमध्ये बेसन आणि थोडे पाणी घालून मिश्रण तयार करा.

  • यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, धणे, हिरवी मिरची, आले लसूण पेस्ट, उरलेले कॉर्न जिरे पावडर, हळद, काळी मिरी पावडर, हिंग, जिरे आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. नीट मिसळेपर्यंत हे मिश्रण ढवळत राहा.

  • आता नॉन स्टिक तवा गरम झाल्यावर पीठ डोशासारखे पसरवून घ्या. त्यावर थोडे तेल घालून नीट शिजवून घ्या.

  • पालक कॉर्न चिला तयार होईल. सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com