How To Remove Tan: उन्हाळ्यात टॅनिंगमुळे चेहरा काळा पडतोय? हा घरगुती उपाय करुन पाहा

Effective Home Remedies To Remove Tan: वाढत्या उन्हामुळे आपल्या आरोग्यावर जितका परिणाम होतो तितकाच आपल्या चेहऱ्यावरही होतो. आपण अधिक सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु, सध्या उन्हाचा वाढत जाणाऱ्या पारामुळे चेहऱ्यावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे.
How To Remove Tan: उन्हाळ्यात टॅनिंगमुळे चेहरा काळा पडतोय? हा घरगुती उपाय करुन पाहा
Tan Removing Tips in MarathiSaam Tv

Tan Removing Tips:

वाढत्या उन्हामुळे आपल्या आरोग्यावर जितका परिणाम होतो तितकाच आपल्या चेहऱ्यावरही होतो. आपण अधिक सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु, सध्या उन्हाचा वाढत जाणाऱ्या पारामुळे चेहऱ्यावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऊन वाढल्यामुळे स्किन टँनिंग होत आहे. सूर्याच्या अतिनिल किरणांचा चेहऱ्यावर परिणाम होतो. ज्यामुळे त्वचा (Skin) काळी पडती. आपल्यापैकी अनेकजण चेहरा काळा पडू नये म्हणून सनस्क्रिन लावतात. त्यामुळे त्वचेच संरक्षण होते.

How To Remove Tan: उन्हाळ्यात टॅनिंगमुळे चेहरा काळा पडतोय? हा घरगुती उपाय करुन पाहा
Ayurvedic Tips For Skin Allergy: उन्हाळ्यात घामामुळे त्वचेला ऍलर्जी आणि खाज सुटण्याची समस्या होतेय? या आयुर्वेदिक टीप्स फॉलो करा

चेहरा काळा पडू नये यासाठी आपण काही घरगुती उपाय (Home Remedies) करु शकतो. ज्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारु शकते. तसेच उन्हाळ्यात त्वचा काळी पडण्याऐवजी ती अधिक तजेलदार होईल जाणून घेऊया कशी

1. कोरफड आणि लिंबू पॅक

कोरफड आणि लिंबाचा बनवलेला पॅक देखील टॅनिंग दूर करण्यासाठी चांगला आहे. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी केवळ टॅनिंग दूर करते तसेच चेहरा अधिक चमकतो. यासाठी कोरफड जेल घेऊन त्यात थोडासा लिंबाचा रस घाला. टॅन पडलेल्या त्वचेवर लावा. व्यवस्थित मालीश करुन थंड पाण्याने धुवा. असे नियमित केल्याने चेहरा उजळण्यास मदत होईल.

2. कोरफड आणि काकडी

उन्हाळ्यात (Summer Season) काकडी अधिक प्रमाणाच पाहायला मिळते. त्वचा तेलकट होत असेल तर कोरफडमध्ये काकडी मिसळून लावा. या दोन्हींचा त्वचेला अनेक प्रकारे फायदा होतो. यामुळे टॅनिंगच नाही तर उन्हाळ्यात होणाऱ्या जळजळीपासून देखील आराम मिळतो. कोरफड जेल घेऊन त्यात काकडी किसून त्याचा रस घाला. चांगल्या प्रकारे मिसळून चेहऱ्याला लावा. १५ ते २० मिनिटानंतर हलक्या हाताने मसाज करुन पाण्याने धुवा. असे केल्याने टॅनिंगपासून स्वत:चे रक्षण करु शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com