Chill Water Side Effect: उन्हाळ्यात बाहेरुन आल्यावर लगेच थंडगार पाणी पिताय? होऊ शकतो त्रास; जाणून घ्या

Chilled Water Side Effect On Body: उन्हाळा सुरु झाल्यावर अनेकजण थंड पदार्थ खाणे, थंड पाणी, शीतपेये पिणे पसंत करतात. परंतु जास्त थंड पदार्थ खालल्याने किंवा पिल्याने शरीराला त्रासदेखील होऊ शकतो.
Chill Water Side Effect
Chill Water Side EffectSaam Tv

Side Effect Of Chilled Water Drink In Summer:

उन्हाळा सुरु झाल्यावर अनेकजण थंड पदार्थ खाणे, थंड पाणी, शीतपेये पिणे पसंत करतात. थंड पदार्थ खालल्याने शरीरात थंडपणा येतो. त्यामुळे चांगले वाटते. परंतु जास्त थंड पदार्थ खालल्याने किंवा पिल्याने शरीराला त्रासदेखील होऊ शकतो.

अनेकदा घराबाहेर गेल्यावर उन्हात आपण शीतपेये पितो. तसेच उन्हातून घरी गेल्यावर लगेच फ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय असते. थंड पाणी पिल्याने तात्काळ आराम मिळतो आणि शरीरातील उष्णता दूर होते. परंतु हा आराम काही काळापुरताच असतो. थंड पाणी पिणे हे शरीरासाठी हानिकारक ठरु शकते.

बर्फाचे पाणी किंवा फ्रिजमधील पाणी प्यायल्याने आरोग्याला गंभीर हानी होऊ शकते. यामुळे हृदयाला धोका निर्माण होऊ शकतो. (Latest News)

पचनसंस्थेवर परिणाम

थंड पाणी प्यायल्याने तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. नियमित थंड पाणी प्यायल्याने अन्न पचण्यास कठीण होते. तसेच पोटदुखी, मळमळ अशा समस्या होऊ शकतात.जेव्हा आपण बाहेरुन घरात आल्यावर थंड पाणी पितो तेव्हा हे पाणी शरीराच्या तापमानाशी जुळत नाही. त्यामुळे अन्न पचण्यास कठीण होते.

डोकेदुखी आणि सायनस

आपण कधीकधी खूप जास्त थंड पाणी किंवा कोल्ड्रिंक्स पितो. त्यामुळे ब्रेन फ्रीझची समस्या होऊ शकते. थंड पाणी पाठीच्या कण्यातील नसांना थंड करते. याचा परिणाम मेंदूवर होतो. यामुळे डोकेदुखीचा तसेच सायनसचा त्रास होऊ शकतो.

Chill Water Side Effect
Government Survey: नोकरदार जोडप्यांनी घरात जेवण बनवणे केलं कमी; डेटातून महत्वाचं कारण आलं समोर

वजन वाढणे

थंड पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी जड होते. त्यामुळे शरीरातील फॅट बर्न होण्यास कठीण जाते. याचा परिणाम म्हणजे शरीरातील वजन वाढते.

Chill Water Side Effect
Bad Digestive System : तुमची पचनक्रिया वारंवार खराब होतेय? या पदार्थांना आजच करा आहारातून बाय-बाय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com