सध्याच्या काळात एकाच कुटुंबातील अनेकजण कामासाठी बाहेर असतात. नवरा-बायको दोघेही कामासाठी बाहेर जात असल्याने अनेकदा जेवण बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळेच बाहेरुन जेवण ऑर्डर करण्याचे प्रमाण जास्त वाढत आहे. याबाबत सरकारकडून डेटा जारी करण्यात आला आहे. यामध्ये शहरी भागात पॅकेज फूड खाण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसत आहे.
शहरी भागात जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त लोक आपले पैसे पॅकेज फूड किंवा हॉटेलमधून जेवण मागवण्यात घालवत असल्याचे दिसत आहे. पॅकेज फूड किंवा हॉटेलमधील अन्नपदार्थ ऑर्डर करण्यात अर्ध बजेट खर्च होत असल्याचे अहवालात समोर आले आहे. (Latest News)
डिलिव्हरी अॅप आणि क्विक कॉमर्सचा वापर सहज सोप्या पद्धतीने शक्य झाल्याने बाहेरुन जेवण मागवण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरी भागातील मध्यमवर्गीय कुटुंबात पॅकेज फूड खाण्याचे प्रमाण वाढले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात पॅकेज फूड खाण्याचे प्रमाण १६ टक्क्यांवरुन २५ टक्के झाले आहे.
घरातील नवरा बायको दोघेही कामाला जात असल्याने त्यांच्याकडे जेवण बनवण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे पर्याय म्हणून ते पॅकेज फूड किंवा फूड डिलिव्हरी अॅपवरुन जेवण ऑर्डर करतात. फूड डिलिव्हरी अॅपवरुनदेखील जेवण मागवण्याचे प्रमाण वाढत आहे.
याबाबत सरकारने अहवाल जारी केला आहे. यात २०१२ पासून २०२३ पर्यंतची टक्केवारी दिली आहे. यामध्ये २०१२ मध्ये अन्नपदार्थांवर किती खर्च केला जायचा आणि २०२३ मधील टक्केवारी दिली आहे. २०१२ मध्ये जवळपास ४२.६ टक्के खर्च अन्नपदार्थांवर केला जायचा तर २०२३ मध्ये हा खर्च ३९.७ टक्के केला जात आहे. तर पॅकेज फूडवरील टक्केवारी ५७.४ टक्क्यांवरुन ६०.३ टक्के झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.