
मायग्रेन हा डोकेदुखीचा एक तीव्र प्रकार आहे ज्याचा सामना करणं फार कठीण होऊन बसतं. या समस्येमध्ये केवळ डोकेदुखीच नाही तर तुमतं शरीर थकतं देखील. त्यामुळे दैनंदिन कामं करणे कठीण होते. मायग्रेन दैनंदिन दिनचर्यामध्ये व्यत्यय आणतं. ज्यामुळे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे आणि दैनंदिन कामे करणे कठीण होतं.
मायग्रेनचा सामना करणं हे फार त्रासदायक ठरतं. याचं कारणं म्हणजे कारण ही समस्या काही तासांपासून ते अनेक आठवड्यांपर्यंत तशीच राहण्याची शक्यता असते. मायग्रेनच्या समस्येत मेंदूतील काही रसायने बाहेर पडतात. मायग्रेनच्या त्रासमध्ये रूग्णाला असह्य डोकेदुखी होऊ शकते.
मायग्रेनला एक साधी आणि किरकोळ समस्या म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. योग्यरित्या याचं मॅनेजमेंट केलं नाही व्यवस्थापन न केल्यास मायग्रेनचे झटके अधिक वारंवार येण्याची शक्यता असते. काही खाद्यपदार्थ खाणे, हार्मोनल बदल, हवामानात अचानक बदल होणे आणि अगदी तीव्र वास येणे अशा काही गोष्टी यास कारणीभूत ठरत असल्याचं मीरा रोडमधील सल्लागार इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक स्पेशलिस्ट डॉ पवन पै यांनी सांगितलंय.
मायग्रेनचा सामना करणे आव्हानात्मक असू शकते, विशेषत: जेव्हा त्यांना डोकेदुखीसह सौम्य ते तीव्र, मळमळ किंवा प्रकाशाची वाढलेली संवेदनशीलता यासह अनेक लक्षणे जाणवू लागतात. जेव्हा तुम्ही एखादे नवीन शहर किंवा नवीन ठिकाणी भेट देत असाव तेव्हा तापमानात अचानक बदल, अतिशय प्रकाश, थकवा आणि वातावरणातील बदलामुळे मायग्रेनची समस्या उद्भवू शकते, जेव्हा प्रकाश जास्त असेल तेव्हा सनग्लासेसचा वापर करणं, भरपूर पाणी पिणं तसंच विश्रांती घेणं गरजेचं आहे.
यासंदर्भात सल्लागार एंडोव्हस्कुलर न्यूरोसर्जन डॉ. नीरज सिंग सांगतात की, मायग्रेन हा आजार निराशाजनक असू शकतो. खास तुम्ही प्रवास करत असताना त्याचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते. अपरिचित ठिकाणी प्रवास, फ्लाइट, कार तसंच ट्रेनमध्ये एकाच ठिकाणी तासनतास बसणं या सर्वांमुळे तुमच्या दिनचर्येत अचानक बदल होऊ शकतात. हे मायग्रेनसाठी संभाव्य ट्रिगर म्हणून ओळखले जातात जे प्रवास करताना मायग्रेनला कारणीभूत ठरू शकतात.
7 ते 8 तासांची झोप न होणं आणि प्रवासादरम्यान पुरेसं पाणी न पिणं किंवा वेळच्या वेळी आहार न घेणं यामुळे मायग्रेनची समस्या उद्भवते. प्रवासावेळी तुम्हाला मायग्रेनचा त्रास होत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमची नेहमीची औषधे सोबत ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.