अनियमित मासिक पाळीमुळे त्रस्त आहात? जाणून घ्या कारणे अन् घरगुती उपाय

आजकाल बहुतेक महिलांना जास्त ताण, खाण्याबाबत निष्काळजीपणा आणि वर्कआउट्सचा अभाव यामुळे अनियमित मासिक पाळी येण्याच्या समस्येने त्रस्त असतात.
Menstrual Cycle
Menstrual CycleSaam Tv
Published On

आजकाल बहुतेक महिलांना जास्त ताण, खाण्याबाबत निष्काळजीपणा आणि वर्कआउट्सचा अभाव यामुळे अनियमित मासिक पाळी येण्याच्या समस्येने त्रस्त असतात. तणावाचा सर्वात मोठा परिणाम महिलांच्या मासिक पाळीवर (Menstrual Cycle) होतो. तणाव आणि चिंता यामुळे हार्मोन्समध्ये बदल (Hormonal Changes) होतो आणि यामुळे अनियमित मासिक पाळी येऊ शकते. जेव्हा तुम्ही तणावामध्ये असता तेव्हा शरीर कॉर्टिसॉल नावाचे हार्मोन सोडते जे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या पातळीवर थेट परिणाम करते.

आजकाल जवळजवळ प्रत्येक महिला अनियमित मासिक पाळीच्या समस्येने त्रस्त आहे. साधारणपणे, तरुण मुलींना 9-13 वर्षांच्या आसपास मासिक पाळी येऊ लागते. त्यानंतर 40-55 वर्षे वयापर्यंत मासिक पाळी सुरु राहते, त्यानंतर रजोनिवृत्तीची स्थिती येते.

पहिल्या काही वर्षांत मासिक पाळी अनियमित असू शकते आणि 3-6 महिन्यांच्या अंतराने येऊ शकते, परंतु 16 वर्षांच्या वयापर्यंत, ते बऱ्यापैकी नियमित होते.

नियमित मासिक पाळीच्या अंतराचा कालावधी सुमारे 21-35 दिवस असतो. हा कालावधी पहिल्या दिवसापासून पुढील कालावधीच्या पहिल्या दिवसापर्यंत मोजला जातो. पीरियड्स काही दिवसांपासून ते एका आठवड्यापर्यंत असतात. जर या स्थितीत काही बदल झाला असेल तर त्याला असामान्य म्हटले जाईल. हे देखील लक्षात घ्या की प्रत्येक कालावधीच्या प्रत्येक चक्राचा कालावधी 3, 4 किंवा 5 आठवडे असला तरीही तो मुख्यत्वे सारखाच राहिला पाहिजे.

Menstrual Cycle
Exercise During Period: पिरियड्स दरम्यान व्यायाम करणे योग्य की घातक? तज्ञ काय सांगतात?

अनियमित मासिक पाळीची लक्षणे -
गर्भाशयात वेदना -
हात, पाय, कंबर आणि स्तन दुखणे -
भूक न लागणे -
थकवा जाणवणे -
बद्धकोष्ठता

डॉ. मीनाक्षी आहुजा, संचालक, प्रसूती आणि स्त्रीरोग, (ला फिमे अध्यक्ष, इंडियन मीनोपॉज सोसाइटी) म्हणतात की योग्य ब्लड फ्लोने नियमित मासिक पाळी येणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. एखाद्या समस्येवर योग्य वेळी उपचार केल्यास तुम्हाला भविष्यातील आरोग्य समस्यांपासून बचाव करता येईल.

Menstrual Cycle
Dark Circles : डार्क सर्कल्समुळे चेहऱ्यावरील सौंदर्य कमी झालंय, करा हे घरगुती उपाय

अनियमित मासिक पाळीची कारणे-

जर तुमची मासिक पाळी अनियमित असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. निरोगी शरीर आणि प्रजनन क्षमता राखण्यासाठी त्या कारणांवर उपचार करणे महत्त्वाचे आहे.

गर्भधारणा हे अनियमित मासिक पाळीच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. त्यामुळे तुम्ही गर्भनिरोधकाचे कोणतेही साधन वापरत नसल्यास, गर्भधारणा (Pregnancy test) चाचणी अवश्य करा.

हार्मोनल असंतुलन (Hormonal Imbalance) हे देखील अनियमित पाळीचे एक प्रमुख कारण आहे. यासोबतच वजन वाढणे, मुरुमे, चेहऱ्यावरील केस यांसारखी इतरही अनेक लक्षणे दिसू शकतात.

यासह, थायरॉईड आणि प्रोलॅक्टिन सारख्या हार्मोन्सची देखील चाचणी करून घेणे आवश्यक आहे. यामुळे देखील अनियमित मासिक पाळी येऊ शकते. आणि यामुळे केस गळणे आणि वंध्यत्वासारख्या इतर समस्या देखील होऊ शकतात, म्हणून कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अनियमित मासिक पाळी हे देखील अकाली रजोनिवृत्तीचे (Premature menopause) लक्षण असू शकते. सध्या वाढलेला ताण, प्रदूषण, सायटोटॉक्सिन, धूम्रपान, चयापचय समस्या यामुळे अंडाशय निकामी होणे अधिक सामान्य झाले आहे. उपचार न केल्यास, अकाली रजोनिवृत्तीमुळे ऑस्टिओपोरोसिस, फ्रॅक्चरचा धोका वाढणे, योनीमार्गात कोरडेपणा, कामवासना कमी होणे आणि हृदयविकार यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, जर तुमची मासिक पाळी अनियमित किंवा कमी वारंवार येत असेल, तर तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे फार महत्वाचे आहे.

हे देखील पहा-

अनियमित मासिक पाळीवर उपचार -
2013 सालच्या 126 लोकांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, 35 ते 40 मिनिटे योगासने, 6 महिने आठवड्यातून 5 दिवस, अनियमित मासिक पाळीशी संबंधित हार्मोन्सची पातळी कमी करण्यास मदत करते.

- यामुळे व्यायाम सुरू करा.

- तुमच्या जेवणाच्या योग्य वेळा ठरवा, झोपा नीट घ्या.

- तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारा.

- तुमच्या शरीराला योग्य तेच खा, जंक, पॅक केलेले, तळलेले, गोड, अन्न टाळा.

- चांगली झोप घ्या. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी मोबाइल वापरू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com