
अचानक वजन कमी होणं नेहमीच चांगलं संकेत नाही; गंभीर आजारांचे लक्षण असू शकते.
डाएट, ताणतणाव, झोपेची कमतरता किंवा मानसिक अस्वस्थता यामुळे वजन कमी होऊ शकतं.
वजन सतत कमी होत असल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.
थकवा, अशक्तपणा, रात्री घाम येणे, भूक न लागणे हे गंभीर लक्षणे आहेत.
बरेच लोक आपल्या वाढत्या वजनामुळे टेन्शनमध्ये असतात. त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करतात. त्यासाठी योग्य डाएट, नियमित व्यायाम आणि परफेक्ट जीवनशैली फॉलो करायला लागतात. काही लोक तर तज्ज्ञांचा सल्ला घेत वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण, तुम्हाला माहीत आहे का? की, वजन कमी होणं नेहमीच चांगल्या आरोग्याचं लक्षण नसतं? काही वेळा वजन अचानक कमी होणं हे शरीरात सुरू असलेल्या गंभीर आजाराचं संकेतही असू शकतं.
अचानक वजन कमी होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. डाएटमध्ये अचानक बदल, जास्त ताणतणाव, झोपेची कमतरता किंवा मानसिक अस्वस्थेमुळे वजन कमी होऊ शकतं. मात्र, काही वेळा यामागे वैद्यकीय कारणंही असतात. आहारतज्ज्ञांच्या मते, अचानक वजन कमी होणं हे मधुमेह, एचआयव्ही, एड्स, पचनाशी संबंधित समस्या किंवा इतर क्रॉनिक आजारांमुळे होऊ शकतं. त्यामुळे जर वजन सतत कमी होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.
ब्रिटनच्या National Health Services (NHS) च्या अहवालानुसार, अचानक वजन कमी होणं ही एक वैद्यकीय स्थिती असू शकते आणि यासाठी वेळेवर तपासणी अत्यंत गरजेची आहे.
जर तुमचं वजन ६ ते १२ महिन्यांच्या काळात शरीराच्या वजनाच्या ५ टक्क्यांपेक्षा जास्त संख्येने कमी झालं असेल, तर हा गंभीर इशारा असतो. विशेषतः जर तुम्ही प्रौढ असाल आणि याआधी काही वैद्यकीय अडचणी अनुभवल्या असतील, तर वजन कमी होण्याकडे दुर्लक्ष करू नका.
तज्ज्ञांच्या मते, अचानक वजन कमी होण्यासोबत जर काही अतिरिक्त लक्षणं दिसू लागली. जसं की थकवा, अशक्तपणा, रात्री घाम येणं, सतत अंग दुखणं, एनर्जी कमी होणं किंवा भूक न लागणं ही अचानक वाढणं तर हे गंभीर आरोग्य समस्येचं चिन्ह असू शकतं.
अचानक वजन कमी होत असल्यास आणि त्यासोबत वरील लक्षणं दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे. कारण हे केवळ डाएट किंवा जीवनशैलीशी संबंधित नसून एखाद्या आतल्या आजाराचं परिणाम असू शकतं. वेळेत निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास समस्या नियंत्रणात येऊ शकते.
आपल्या शरीरातील बदल हे नेहमी काही ना काही सांगत असतात. त्यामुळे वजनात अचानक झालेला बदल हा नेहमीच तपासून घ्यावा. कारण आरोग्यापेक्षा मोठं धन दुसरं काही नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.