Palmistry: अशा व्यक्ती राजकारण-मॉडेलिंगमध्ये कमावतात खूप नाव; पाहा तुमच्या हातावरच्या रेषा काय सांगतात?

Actor And Musician Yog: हस्तरेखा शास्त्रानुसार हातावरील रेषा व्यक्तीच्या जीवनातील यश, करिअर आणि प्रसिद्धीबद्दल महत्त्वाचे संकेत देतात. अनेक वेळा राजकारणात किंवा मॉडेलिंग क्षेत्रात प्रचंड प्रसिद्धी मिळवणाऱ्या व्यक्तींच्या हातात विशिष्ट रेषा दिसतात.
Palmistry
Palmistrysaam tv
Published On

तुम्ही कधी तुमचा हात नीट निरखून पाहिलाय का? आपल्या हातांवर अनेक रेखा असतात. मात्र या रेखांचा अर्थ तुम्हाला माहितीये का? हस्तरेषाशास्त्रामधये काही प्रमुख रेषा असून त्यांना एक महत्त्व आहे. जर या रेषा स्पष्ट आणि असतील तर त्यामुळे त्या व्यक्तीला पुरेपुर फायदा मिळतो. तुमच्या हातावर शुक्र, शनि, सूर्य आणि बुध पर्वत असल्यास व्यक्तीला सर्व भौतिक सुखसोयी आणि संपत्ती मिळते.

आम्ही तुम्हाला अशा योग आणि विशेष रेषांबद्दल सांगणार आहोत ज्या तुमच्या हातांवर असतील तर राजकारण आणि सिनेसृष्टी उद्योगात नाव कमावण्यास मदत मिळते. चला जाणून घेऊया या कोणत्या रेषा आहेत.

Palmistry
Dhan Rajyog: 30 वर्षांनंतर शनी देव वक्री अवस्थेत बनवणार धन राजयोग; 'या' राशींना मिळणार अपार धनलाभ

हस्तरेषाशास्त्रानुसार, राजकारणात रस असलेल्यांचे तळवे पांढरे आणि हात लांब असतात. जर एखाद्या व्यक्तीच्या हातातील मस्तक रेषा गुरु पर्वताकडे झुकलेली असेल तर ती व्यक्ती एक चांगला कलाकार, अभिनेता किंवा नेता असू शकते. शिवाय, या व्यक्तींना जीवनात बराच आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकते.

जर शुक्र पर्वत (त्या रेषा योग्य विकसीत असतील)तर अशा व्यक्तीला मॉडेलिंगमध्ये चांगली संधी मिळू शकते. अशा व्यक्ती संगीतातही चांगलं नाव कमावू शकतात. या व्यक्तींकडे आयुष्यभर संपत्तीचा साठा असतो. तसंच या व्यक्ती आकर्षक असून इतरांना आवडू शकतात.

Palmistry
Panchgrahi Yog: जानेवारीमध्ये शनीच्या राशीत बनणार पॉवरफुल पंचग्रही राजयोग; नव्या वर्षात 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

इंद्रराज योग असणं

ज्या व्यक्तींच्या तळहातावर इंद्रराज योग असतो ते राजकारणात त्याचं चांगलं नाव कमावतात. ज्यावेळी मंगळ पर्वत प्रमुख असतो तेव्हा कपाळ आणि भाग्य रेषांचा पूर्ण विकास होतो तेव्हा हा योग तयार होतो. हा योग व्यक्तींना कोणत्याही गोष्टीचं नेतृ्त्व करण्यास आवडतं. या व्यक्ती आत्मविश्वासू आणि मेहनती देखील असतात.

Palmistry
Surya-Shani Yuti: 30 वर्षांनंतर चमकणार या राशींचं नशीब; शनी-सूर्याच्या आशीर्वादाने मिळणार नुसता पैसा

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती हस्त रेषा शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com