Panchgrahi Yog: जानेवारीमध्ये शनीच्या राशीत बनणार पॉवरफुल पंचग्रही राजयोग; नव्या वर्षात 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा

Panchgrahi Yog 2026 Predictions: ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी २०२६ मध्ये शनीच्या राशीत पाच ग्रहांची शक्तिशाली युती होणार आहे. ही युती अत्यंत दुर्मिळ मानली जाते आणि तिचा प्रभाव अनेक राशींवर दिसून येईल.
Panchgrahi Yog
Panchgrahi Yogsaam tv
Published On

वैदिक ज्योतिषानुसार 2026 मध्ये अनेक ग्रहांचं गोचर होऊन त्रिग्रही आणि पंचग्रही योग तयार होतील. याचा परिणाम अनेक राशींच्या दिसून येईल. 2026 च्या जानेवारी महिन्यात शनीच्या राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे.

त्रिग्रही योग सूर्य, शुक्र, मंगळ, चंद्र आणि बुध यांच्या युतीने तयार होणार आहे. या योगामुळे काही राशींचे भाग्य उजळून निघणार आहे. तर काहींना नवीन नोकरी आणि अपार धनलाभ मिळण्याची संधी मिळू शकणार आहे. चला पाहूया कोणत्या राशींसाठी हा काळ शुभ ठरू शकतो.

Panchgrahi Yog
Shani Nakshatra Gochar: वर्षाच्या अखेरीस शनी बदलणार नक्षत्र; 'या' राशी जगणार राजासारखं आयुष्य, नशीबही उजळणार

मकर रास (Makar Zodiac)

मकर राशीसाठी पंचग्रही योग अत्यंत लाभदायक ठरू शकणार आहे. कारण हा योग तुमच्या राशीच्या लग्नभावात तयार होणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. यावेळी कुटुंबात आनंदाचं वातावरण राहणार आहे. विवाहितांसाठी वैवाहिक जीवन सुखकर राहण्याची शक्यता आहे.

मेष राशी (Aries Zodiac)

मेष राशीसाठी पंचग्रही योग सकारात्मक ठरू शकणार आहे. हा योग तुमच्या गोचर कुंडलीतील कर्मभावात तयार होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. अचानक उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. पारिवारिक संपत्ती किंवा वारशातून लाभ मिळू शकतो.

Panchgrahi Yog
October Grah Gochar: ऑक्टोबरमध्ये सूर्य-शनीसोबत 6 ग्रह बदलणार रास; 'या' राशी जगणार राजासारखं आयुष्य

वृषभ राशी (Taurus Zodiac)

वृषभ राशीसाठी पंचग्रही योग लाभदायक ठरू शकणार आहे. हा योग तुमच्या राशीच्या भाग्यभावात तयार होणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाचा साथ मिळेल. धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवाढ होण्याचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.

Panchgrahi Yog
Grah Gochar November: नोव्हेंबर महिन्यांच्या २३ दिवसांमध्ये ३ ग्रह करणार गोचर; ४ राशी जगणार राजासारखं आयुष्य

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com