Shani Nakshatra Gochar: वर्षाच्या अखेरीस शनी बदलणार नक्षत्र; 'या' राशी जगणार राजासारखं आयुष्य, नशीबही उजळणार

Shani Nakshatra Gochar 2024: यंदाच्या वर्षाच्या शेवटी शनी नक्षत्र बदलून पूर्वाभाद्रपदात म्हणजेच गुरूच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
Shani Nakshatra Gochar
Shani Nakshatra Gocharsaam tv
Published On

वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. याशिवाय ग्रह राशीनुसार, त्यांच्या नक्षत्रामध्ये देखील बदल करताना दिसतात. यंदाच्या वर्षाच्या शेवटी शनी नक्षत्र बदलून पूर्वाभाद्रपदात म्हणजेच गुरूच्या नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यावेळी काही राशीच्या लोकांना नवीन वर्ष 2025 मध्ये बंपर फायदे मिळू शकणार आहेत.

कधी करणार शनी नक्षत्र गोचर?

वैदिक पंचांगानुसार, शनी 27 डिसेंबर रोजी रात्री 10:42 वाजता पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये गोचर करणार आहे. यानंतर तो 28 एप्रिल 2025 पर्यंत या नक्षत्रात राहणार आहे. हे 27 नक्षत्रांपैकी 25 वं नक्षत्र आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

वृषभ रास

पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर या राशीच्या दहाव्या घरात शनी आहेत. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात सुख-समृद्धी वाढणार आहे. यामुळे तुमचं दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होऊ शकणार आहे. तुमच्या आयुष्यात अनेक बदल दिसण्याची शक्यता आहे. तुमचं कामाच्या ठिकाणी खूप कौतुकही होऊ शकते.

Shani Nakshatra Gochar
१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

मकर रास

या राशीच्या लोकांसाठी शनीचा गुरूच्या नक्षत्रात प्रवेश देखील फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांची प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकणार आहात. जर तुम्ही शारीरिक आणि मानसिक तणावाचा सामना करत असाल तर तुम्हाला शनीच्या या राशी बदलाचा लाभ मिळू शकणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकणार आहेत.

Shani Nakshatra Gochar
Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

वृश्चिक रास

पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर या राशीच्या चौथ्या भावात शनी राहणार आहे. या काळात बेरोजगारांना नोकरी मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस दुप्पट होण्याची शक्यता आहे.

Shani Nakshatra Gochar
Guru Margi 2025: बृहस्पती 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार; सुख-समृद्धीसह-धनसंपत्तीही वाढणार

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com