5 Best Tomato Substitutes : टोमॅटो महागला ! आंबट-गोड चव येण्यासाठी हे पदार्थ वापरुन पाहा, जेवण बनेल चमचमीत

Substitute For Tomatoes In Cooking : टोमॅटोसारखी चव हवी असेल तर या पर्यायी पदार्थांचा वापर आपण करु शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल
5 Best Tomato Substitutes
5 Best Tomato SubstitutesSaam tv
Published On

Substitute For Tomatoes In Curry : सध्या टोमॅटोचे दर हे गगनाला भिडलेले आहेत. अनेक ठिकाणी टोमॅटोचा भाव हा 100 ते 150 रुपये किलो किंवा त्याहून अधिक दराने विकला जात आहे. अशातच टोमॅटो महाग झाल्यामुळे गृहिणींची तारेवरची कसरतच सुरु झाली.

टोमॅटो हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा पदार्थ. वरणाला फोडणी देण्यापासून ते भाजीत आंबटरपणा आण्यासाठी टोमॅटो हा फायेदशीर ठरतो परंतु, बहुतेक खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटोचा समावेश केला जातो. टोमॅटोमुळे पदार्थाची चव टिकून राहाते पण जर तुम्हाला एखादा पदार्थ बनवायचा असेल पण टोमॅटोसारखी चव हवी असेल तर या पर्यायी पदार्थांचा वापर आपण करु शकतो. जाणून घेऊया त्याबद्दल

5 Best Tomato Substitutes
Lipstick Side Effects : ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी रोज लिपस्टिक वापरताय? मग होणारे नुकसानही जाणून घ्या

1. लिंबू –

भाजीमध्ये आंबटपणा येण्यासाठी टोमॅटोऐवजी (Tomato) लिंबाचा वापर करता येईल. भाजीत लिंबू घालून त्याची चव दुप्पट करू शकता. लिंबू हा टोमॅटोसाठी स्वस्त पर्याय मानला जाऊ शकतो. लिंबाच्या रसात थोडी साखर (Sugar) टाका, मग त्याची चव अगदी टोमॅटोसारखी होईल.

2. कच्ची कैरी –

कच्चा आंबा टोमॅटोसारखा आंबट-गोड असतो. करीमध्ये टोमॅटोची कमतरता भरून काढू शकते. करी आंबट करण्यासाठी कच्चा आंबा हा उत्तम पर्याय आहे. सध्या कच्ची कैरी किंवा सुकलेली कैरी आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते आपण त्याचा वापर करुन जेवण बनवू शकतो.

5 Best Tomato Substitutes
Adah Sharma : तुझी घायाळ करणारी 'अदा'; अन् नजरेला भिडणार सौंदर्य, कमालच !

3. चिंच –

भाजी बनवताना टोमॅटो नसेल तर त्यात चिंचेचा कोळ घालू शकतो. चिंचेची चव आंबट-गोड असते, जी भाजीत मिसळल्यास त्याची चव दुप्पट होते. चिंच वापरण्यापूर्वी पाण्यात भिजवून ठेवा. त्याचा लगदा बारीक करून पेस्ट तयार करू शकता. हे छान चव देते.

4. दही (Curd) -

टोमॅटोला पर्याय म्हणून दही देखील वापरता येते. कोणत्याही भाजीची चव वाढवण्यासाठी दही घालू शकतो. भाजीच्या ग्रेव्हीमध्ये घट्टपणा आणि आंबटपणा आणण्यासाठी व पदार्थाची चव वाढवण्यासाठी आपण याचा वापर करु शकतो. दही घातल्याने भाजीचा रंग अधिक आकर्षक होतो. टोमॅटोऐवजी थोडे दही वापरणे हा एक चांगला मार्ग आहे.

5 Best Tomato Substitutes
Yellow Teeth Whitening Remedy : ब्रश केल्यानंतरही दातांचा पिवळेपणा जात नाही ? हा 'घरगुती उपाय' ट्राय करुन पाहा, दात होतील पांढरे शुभ्र

5. आवळा -

आवळा हा चवीला तुरट असला तरी यांच्या वापरामुळे पदार्थाची चव वाढवता येऊ शकते. आवळा मिक्सीमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवा आणि भाज्या किंवा इतर कोणत्याही डिशमध्ये वापरु शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com