Breaking News

How To Reduce Hip Fat : हिप्स वरील चरबी कमी करण्यासाठी काही खास एक्सरसाइज, शेपमध्ये येईल बॉडी

Reduce Fat On Hips : बॉलीवूड अभिनेत्रींची फिगर पाहून आपल्यालाही असे वाटते की आपली सुद्धा अशीच फिगर असावी.
How To Reduce Fat On Hips
How To Reduce Fat On Hips Saam Tv
Published On: 

How To Reduce Hip Fat : बॉलीवूड अभिनेत्रींची फिगर पाहून आपल्यालाही असे वाटते की आपली सुद्धा अशीच फिगर असावी. अनेक लोकांना असे वाटते की त्यांचे हिप फ्लॅट न दिसता राऊंड दिसावे.

कारण की फ्लाईट हिप जीन्स आणि ट्राउझर मध्ये खराब दिसतात. त्यामुळे अनेक लोक (People) हिप शेपमध्ये ठेवण्यासाठी काय काय नाही करत. पण अनेक वेळा आपलं वजन वाढतं आणि आपल्या फिगर खराब दिसू लागते.

अशातच आपल्या हिप्सला शेप देण्यासाठी एक्सरसाइज करणे अत्यंत गरजेचे असते. तुम्ही आम्ही सांगितलेल्या पद्धतीने एक्सरसाइज कराल तर तुमचे मसल्स योग्य पद्धतीने टार्गेट करतील. तर हे निश्चित आहे की तुमचे हिप राऊंड शेपमध्ये (Shape) येतील.

या विषयाला घेऊन एक्सपर्ट डॉक्टर हितेश खुराना सांगतात की, आपल्या बाहेरील बॉडीची मासपेशी बनण्यासाठी काही एक्सरसाइज कराव्या लागतात. ज्यामध्ये तुमचे पाय सेंट्रल लाईन पासून मुव करायला हवे.

डॉक्टर हितेश खुराना कायरो प्रॅक्टिक, एर्गोनोमिक विशेषतज्ञ आणि वरिष्ठ फिजिओथेरपीस्ट आहेत. एक्स्पर्टच्या सांगण्यानुसार काही अशा एक्सरसाइज सुद्धा आहे ज्याने तुम्ही तुमचे हिप शेपमध्ये आणू शकता.

How To Reduce Fat On Hips
Weight Gain Tips : खा खा खाल्ल तरी वजन काही वाढत नाही ? वजन वाढवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

बेसिक हिप लिफ्ट -

* एक्सरसाइज करण्यासाठी जमिनीवर पाटण ठेवून झोपायचे आहे नंतर हातांना चटईवर ठेवायचे आहे.

* तुमचे पाय अर्धे दुमडलेले असायला हवे.

* ही एक्सरसाइज तुमच्या हीपचे मसल्स ऍक्टिव्ह करते.

* असं केल्याने तुमच्या हिपला तणाव जाणवत नाहीं.

* बाहेरील शरीरामधील फक्त खांदे ,हात आणि डोकं जमिनीवर ठेवून हिप उचलायचे आहे.

* एक्सरसाइज तुम्हाला वीस वेळा करायची आहे.

ग्लुट ब्रीज -

* एक्सरसाइज तुमच्या शरीराच्या खालच्या भागाचे मसल्स मजबूत बनवण्याचे काम करते.

* सर्वात आधी कमरेवरती सरळ झोपा

* त्यानंतर आपल्या हातांना बाजूला रेस्टिंग पोझिशन मध्ये आणा

* आता आपल्या पायांना होल्ड करत हळूहळू वरच्या दिशेला या

* तुम्हाला तुमचा फोटो वरच्या दिशेने फुल करायचे आहे

* आणि आपल्या खांद्यांना सरळ ठेवायचे आहे

* पंधरा सेकंद नंतर पुन्हा आधीच्या पोझिशनमध्ये या

How To Reduce Fat On Hips
Weight Gain Diet : कितीही खाल्लं तरी अंगाला लागत नाही, वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहात? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

हिल्स टच एक्सरसाइज -

जर तुमच्या हिप्सच्या आसपास जास्त चरबी जमलेली असेल तर, तुम्हाला हिल टच एक्सरसाइज करावी लागेल. ही एक्सरसाइज केल्याने तुमच्या बॉडीला शेप येतो.

* यासाठी तुम्हाला सर्वात आधी सरळ झोपायचे आहे

* तुमच्या गुडघ्यांना पायांच्या बळावरती उभे करा

* त्यानंतर तुमची मान हलकीशी उचला

* तुमच्या दोन्ही हातांनी स्वतःच्या पायांना हात लावण्याचा प्रयत्न करा

* तुम्हालाही एक्सरसाइज हळूहळू वीस वेळा करायची आहे

* तुम्हाला काही दिवसांतच फायदा पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com