Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्नॅपचॅटचं युजर्सना मोठं गिफ्ट; ३ एआर लेन्स लाँच

Ganesh Chaturthi 2023: या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्नॅपचॅट तीन मजेदार AR लेन्स लाँच करण्यात आले आहे.
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023Saam tv
Published On

Ganesh Chaturthi:

अनेकांनी गणेश चतुर्थीसाठी लगबग सुरू केली आहे. या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्नॅपचॅट तीन मजेदार AR लेन्स लाँच करण्यात आले आहे. या लेन्समुळे या उत्सवात एक छान टेक ट्विस्ट जोडला जाणारक आहे. मोदक रन लेन्स, बाप्पा आरती लेन्स आणि विसर्जन बीच केअर लेन्ससह या लेन्समध्ये परंपरा आणि नावीन्य यांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

स्नॅपचॅटच्या मोदक रन लेन्ससह इतर लेन्सचा वापर करता येणार आहे. AR गेम लेन्समुळे तरुण मुले आभासी जगात पाय ठेवतात. तिथे गणपतीसाठी मोदक गोळा करण्याच्या शोधात असतात. तो फक्त एक खेळ आहे. या खेळात भक्ती आणि आनंद यांचे मिश्रण आहे.

Ganesh Chaturthi 2023
Richest Ganpati In Mumbai : मुंबईतील या भागात 69 किलो सोने, 336 किलो चांदीने सजते श्रीगणेशाची मूर्ती; कारणंही आहे खास

स्नॅपचॅट बाप्पाची आरती लेन्स लाँच करत आहे. आरती लेन्सच्या सहाय्याने, तुम्ही गणपतीची मूर्ती किंवा फोटो धरून आणि लेन्स पवित्र घटकांना जिवंत करत असताना गणपतीला विविध वस्तू अर्पण करून, आभासी आरती विधीमध्ये सहभागी होऊ शकता.

यावर्षी, गणेश विसर्जनानंतर पर्यावरणीय जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी स्नॅपचॅट खुशीयान फाउंडेशन आणि त्यांच्या बीच वॉरियर्स प्रकल्पासोबत सहयोग करत आहे. या सहकार्याचा एक भाग म्हणून, स्नॅपचॅट एक आकर्षक आणि गेमिफाइड विसर्जन बीच केअर लेन्स लाँच करत आहे.

Ganesh Chaturthi 2023
Car Care Tips : प्रवासात कारचा टायर पंक्चर झाल्यावर काय कराल? ही सोपी ट्रिक येईल कामी

दरम्यान, विसर्जन बीच केअर लेन्स वापर करून बीच क्लीन-अप चॅलेंज पूर्ण करणाऱ्या स्नॅपचॅटर्सना "बीच वॉरियर" बॅजने पुरस्कृत केले जाईल. खुशीयान फाऊंडेशनचा बीच वॉरियर्स उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून भारतातील सर्वात व्यापक समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आघाडीवर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com