Car Care Tips : प्रवासात कारचा टायर पंक्चर झाल्यावर काय कराल? ही सोपी ट्रिक येईल कामी

Car Tyre Puncture : प्रवासात अचानक टायर पंक्चर झाले आणि तुम्ही तरीही कार चालवत राहिल्यास मोठे नुकसान होऊ शकते.
Car Care Tips
Car Care TipsSaam Tv
Published On

Car Tyre Puncture Tips :

प्रवास करताना अचानक टायर पंक्चर झाले आणि तुम्ही तरीही वाहन चालवत राहिल्यास टायर खराब होऊ शकते. पण, एक मोठी अडचण अशी आहे की अनेकांना त्यांच्या वाहनांचा टायर पंक्चर झाल्याचे पटकन कळत नाही. विशेषत: नवीन ड्रायव्हरला गाडी चालवताना टायर पंक्चर झालेले लवकर लक्षात येत नाही.

अशा स्थितीत तुम्ही वाहन (Vehicle) चालवत राहिल्यास तुमच्या गाडीचा टायर नक्कीच खराब होईल आणि तो कट होईल. असे झाल्याने तुम्हाला नवीन टायर घ्यावा लागेल, जो महाग असेल. तर टायर पंक्चर झाल्याची माहिती वेळेत मिळाल्यास मोठा खर्च टाळता येईल. चालत्या कारच्या टायर पंक्चरचा अंदाज कसा लावायचा ते आपण येथे पाहूयात.

Car Care Tips
Car Overloading : वीकेंडला बाहेर जाताना कारमध्ये जास्त सामान ठेवताय? होईल हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या

समोरच्या टायरमध्ये पंक्चर

जर तुमच्या कारच्या (Car) पुढच्या टायरमध्ये पंक्चर असेल, तर तुमच्या कारचे ज्या बाजूचे टायर पंक्चर झाले आहे, ती बाजू अधिक पुढे जाऊ लागते. तुमचे स्टीयरिंग थोडे कठीण होईल. ज्या दिशेला टायर पंक्चर झाला असेल त्या दिशेने स्टीअरिंग वारंवार वळत असल्यासारखे तुम्हाला वाटेल. स्टीयरिंग नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला अधिक शक्ती लागू शकते. जर डाव्या बाजूचा टायर पंक्चर झाला तर गाडी पुन्हा पुन्हा डाव्या बाजूने जाऊ लागेल तसेच उजव्या बाजूलाही होईल. असे झाल्यास, ताबडतोब थांबा आणि टायर तपासा.

मागील टायरमध्ये पंक्चर

चालत्या कारच्या मागील टायरमध्ये पंक्चर शोधणे थोडे कठीण आहे. मात्र, कारच्या मागील टायरमध्ये पंक्चर झाल्यास गाडीचे पिकअप कमी होते. तुम्हाला असे वाटेल की कोणीतरी गाडी मागे खेचत आहे. तुम्हाला असे वाटेल की कार दबावाखाली फिरत आहे आणि पुढे जाण्यासाठी अधिक शक्ती लागतेय. पंक्चरमुळे गाडीचा तोलही बिघडतो, त्यामुळे वाहनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होते. गाडी अचानक अस्थिर झाली आहे असे वाटत असले तरी एकदा टायर तपासा. अशा स्थितीत तुमच्या कारचा टायर (Tyre) पंक्चर झाला असण्याची दाट शक्यता असते.

Car Care Tips
Mini Electric Car: मिनी पण जबरदस्त; टू-डोअर इलेक्ट्रिक कार अवघ्या 3.47 लाखात लॉन्च; एका चार्जमध्ये मुंबई-पुणे 4 फेऱ्या मारता येतील...

टायर पंक्चर झाल्यास काय करावे?

टायर पंक्चर झाल्यास, कारच्या बाजूला पार्क करा आणि कारमध्ये स्टेपनी टायर बसवा. परंतु, लक्षात ठेवा की स्टेपनी टायरचा मुख्य टायर म्हणून वापर करू नका. जिथे तुम्हाला मेकॅनिक मिळेल तिथे तुमच्या मुख्य टायरचे पंक्चर दुरुस्त करून घ्या आणि त्याचाच वापर करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com