Sleep cycle: पुरेशी झोप न घेतल्याने बिघडू शकतं मानसिक आरोग्य; माणसाने रोज किती वेळ झोपावे? जाणून घ्या

Sleep Cycle : सध्याचे जीवन खूप जास्त धावपळीचे आणि व्यस्त आहे. त्यामुळे अनेकदा आपले आहाराकडे, झोपेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. उत्तम आरोग्यासाठी चांगला आहार आणि पुरेशी झोप महत्त्वाची असते.
Sleep
Sleep Saam Tv
Published On

Sleep Cycle Impoartant For Mental Health:

सध्याचे जीवन खूप जास्त धावपळीचे आणि व्यस्त आहे. त्यामुळे अनेकदा आपले आहाराकडे, झोपेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. उत्तम आरोग्यासाठी चांगला आहार आणि पुरेशी झोप महत्त्वाची असते. माणसाची पुरेशी झोप पूर्ण न झाल्यास त्याचा परिणाम माणसिक आरोग्यावर होतात. (Latest News)

पूरेशी झोप महत्त्वाची

माणासाने रोज पुरेशी झोप घ्यायला हवी. जर तुम्ही पुरेशी झोप गेत नसाल तर त्याचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे माणसाची चिडचिड होते, थकवा जाणवतो. अपूर्ण झोपेमुळे मेंदू नीट काम करत नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी झोप येते. परिणामी काम व्यवस्थित होत नाही. याचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि करिअरवर वाईट परिणाम होऊ शकतो.

पुरेशी झोप न घेतल्याने तुमच्या आयुष्यात ताण वाढत जातो. त्यामुळे चिंता आणि नैराश्यसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुम्हाला उत्तम आरोग्य हवे असेल तर पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे.

Sleep
Vastu Tips : आरशाप्रमाणे चमकेल तुमचं नशीब, वास्तूशास्त्रानुसार कोणत्या दिशेला आरसा लावायचा ते पाहा

माणसाने किती तासाची झोप घ्यावी?

माणासाची झोप ही त्याच्या वयावर अवलंबून असते. लहान मुलांना जास्त झोप आवश्यक असते. ४ ते १२ वयोगटातीव मुलांना १२ ते १६ तासांची आवश्यक अले. तर १ ते २ वर्षांच्या मुलांना ११ ते १४ तासांची झोप आवश्यक असते. ३ ते ५ वर्षीय मुलांनी १० ते १३ तासांची झोप घ्यायला हवी. ६ ते १२ वर्षांच्या मुलांनी ९ ते १२ तासांची झोप घ्यायला हवी. तर १८ आणि १८ पेक्षा जास्त वयोगटातील लोकांनी ७ ते ८ तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे.

Sleep
Peanut Paratha: लहान मुलांना डब्ब्याला द्या शेंगदाणा पोळी; जाणून घ्या सिंपल रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com