थंडीच्या दिवसांत सतत त्वचेला खाज सुटतेय? त्वचेचा 'हा' गंभीर आजार असू शकतो, तज्ज्ञांनी केलं सावध

एटोपिक डर्माटायटीस सारख्या त्वचेची स्थिती लहान मुलांपासून ते वयो-वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकते.
 Itchy Skin
Itchy SkinSaam TV
Published On

एटोपिक डर्माटायटीस हा एक प्रकारचा त्वचारोग आहे. हा एक जुनाट आजार आहे असून त्यामुळे त्वचा लाल होते आणि त्वचेला खाज सुटते आणि जळजळ होते. एटोपिक डर्माटायटीस सारख्या त्वचेची स्थिती लहान मुलांपासून ते वयो-वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकते. मुलांमध्ये किंवा विशिष्ट ऍलर्जी असणाऱ्या किंवा दम्याचा कौटुंबिक इतिहास असलेल्यांमध्ये हे अधिक सामान्य आहे.

एटोपिक डर्माटायटीस हा त्रासदायक असू शकतो परंतु सुदैवाने, तो संसर्गजन्य नाही. सतत खाज सुटणं आणि अस्वस्थतेमुळे एटोपिक डर्माटायटीस सामना करणे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरते. या त्वचारोगामुळे एकाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर आणि त्यांच्या झोपेच्या चक्रावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. योग्य खबरदारी बाळगुन तुम्ही ही स्थिती नियंत्रित करू शकता आणि योग्य उपचार आणि सावधगिरीने त्याची लक्षणे देखील व्यवस्थापित करू शकता.

 Itchy Skin
Walk As Per Age: वयोमानानुसार तुम्ही किती पावलं चालली पाहिजेत? पाहा संपूर्ण चार्ट

काय आहेत याची कारणं?

एटोपिक डर्माटायटीसचं नेमकं कारण अजून माहित नाहीये. असं मानलं जातं की, एटोपिक डर्माटायटिस हे आनुवंशिकता, पर्यावरणीय घटक आणि इतर अनेक घटक यास कारणीभूत ठरु शकतात. एक्झिमा, दमा आणि परागज्वर यांसारख्या परिस्थितींचा कौटुंबिक इतिहास असलेल्यांना व्यक्तींना एटोपिक डर्माटायटीसचा शक्यता अधिक असते. अतिरीक्त ताण, तापमानात अचानक होणारे बदल आणि रासायनिक उत्पादनांचा वापर अशी उत्पादने या स्थितीची तीव्रता वाढवू शकतात.

 Itchy Skin
Child cardiac Arrest: लहान मुलांना हार्ट अटॅक येण्याची कारणं वेगळी, पालकांनी काय केलं पाहिजे, तज्ज्ञांनी दिला सल्ला

याची लक्षणं काय दिसून येतात?

एटोपिक डर्माटायटिसच्या बाबतीत अनेक लक्षणे दिसू येतात व ही लक्षणे संबंधीत परिस्थितीची तीव्रता तसेच विविध घटकांनुसार व्यक्तीपरत्वे बदलू शकतात. कोरडी त्वचा, त्वचेस खाज सुटणे, त्वचेवरील लालसरपणा व सूज, द्रवाने भरलेले फोड, जाड आणि खपलीयुक्त फोड, वाढती संवेदनशीलता, पुरळ यांचा समावेश असू शकतो.

 Itchy Skin
Kidney Cancer: किडनी कॅन्सरवेळी सुरुवातीला शरीर देतं 'हे' संकेत; रात्रीच्या वेळेस जाणवतील अचानक बदल

एटोपिक डर्माटायटीसचा तुमच्या शरीरातील विशिष्ट भागांवर परिणाम होतो जसे की तुमचा चेहरा, मान, हात, गुडघे किंवा कोपर. सतत खाज सुटण्यामुळे, एटोपिक डर्माटायटिसमुळे झोपेच्या गुणवत्तेवर आणि दैनंदिन क्रियांवर खूप परिणाम होऊ शकतो. कालांतराने, यामुळे अस्वस्थता आणि भावनिक गोंधळ उडू शकतो.

 Itchy Skin
Uterine Cancer : गर्भाशयाच्या कॅन्सरच्या सुरुवातीला महिलांच्या शरीरात दिसतात 'हे' मोठे बदल, अधिकतर महिला करतात इग्नोर

या समस्येवर कसा कराल उपचार?

योग्य उपचार आणि सावधगिरी बाळगल्यास लक्षणे व्यवस्थापित करण्यात तसेच ते नियंत्रित करता येऊ शकतात. उपचार पर्यायांमध्ये सामान्यत: आपली त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर्सचा वापर करणे आणि जळजळ कमी करण्यासाठी टॉपिकल क्रीम वापरणे गरजेचे आहे. जर तुमचा एटोपिक डर्माटायटिस हा गंभीर स्वरुपाचा असेल असेल तर तुमचे डॉक्टर प्रभावी परिणामांसाठी फोटोथेरपी किंवा काही औषधांची शिफारस करू शकतात.

तिखट पदार्थांचे सेवन टाळणे किंवा रासायनिक उत्पादनांचा वापर टाळणे, ऍलर्जी निर्माण करणारे किंवा हवामानातील बदल यासारखे ट्रिगर्स टाळा जे तुमच्या त्वचेला त्रास देऊ शकतात. तुमच्या त्वचेवर मॉइश्चरायझरचा वापर करा जेणेकरून त्वचेतील आर्द्रता टिकून राहिल आणि त्वचा कोरडी होऊन खाज येणार नाही. नेहमी सुती आणि सैलसर कपडे घाला. गरज भासल्यास ह्युमिडिफायर वापरा ज्यामुळे त्वचेचा जळजळ कमी होण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com