Skin Care Tips : त्वचेसाठी बेस्ट आहेत ही ५ जीवनसत्त्वे, चेहरा राहिल दिवसभर ग्लोइंग
5 Vitamins Helpful For Skin :
दिवसभर आपला चेहरा फ्रेश आणि टवटवीत राहावा असा प्रत्येकाला वाटत असते. चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहण्यासाठी आपण अनेक प्रयत्न देखील करतो. उन्हाळ्यात आपल्या त्वचेला सर्वात जास्त टॅनिंगचा सामना करावा लागतो.
उन्हाच्या किरणांमुळे किंवा घामामुळे चेहऱ्याची चमक कमी होते. त्वचेवर मुरुमे येऊ लागतात. अशावेळी त्वचा अधिक मऊ, चमकदार ठेवण्यासाठी बेसनाची पेस्ट, हळदीची पेस्ट किंवा आपण इतर घरगुती उपाय करुन पाहतो. परंतु, चेहऱ्याला (Skin) अधिक गरज असते ती पोषकतत्वांची. आहारात काही विशिष्ट जीवनसत्त्वाचा समावेश केल्यास फायदा (Benefits) होईल जाणून घेऊया त्याबद्दल
1. जीवनसत्त्व ए
जीवनसत्त्व (Vitamins) ए मध्ये त्वचेच्या नवीन पेशींचे उत्पादन वाढवते. त्वचेच्या सूर्यकिरणांपासून सरंक्षण करण्यासाठी आणि कोलेजनला प्रोत्साहन देण्यासाठी हे फायदेशीर आहे. जीवनसत्त्व ए हे कोरड्या त्वचेच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. त्यामुळे मुरुमाची समस्या दूर होते. यासाठी आहारात रताळे, दही, अंडी, गाजर आणि लाल मिरचीचा समावेश करा.
2. जीवनसत्त्व सी
चेहऱ्याच्या त्वचेसाठी जीवनसत्त्व सी सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. आहारात जीवनसत्त्व सी चे सेवन अधिक प्रमाणात केल्याने त्वचा टोन्ड आणि चमकदार होते. यासाठी आहारात आवळा, लिंबू, संत्री, टोमॅटो, हिरवी आणि लाल मिरची, हिरव्या भाज्या, आंबट फळे याचा समावेश करा.
3. जीवनसत्त्व ई
जीवनसत्त्व ई चेहऱ्याची चमक टिकवून ठेवण्यास मदत करते. यासाठी आपण जीवनसत्त्व ई कॅप्सूल चेहऱ्याला लावू शकता किंवा आहारात त्याचा समावेश करु शकता.
4. जीवनसत्त्व के
जीवनसत्त्व के मुळे चेहऱ्यावरील जखमा भरण्यासोबतच काळी वर्तुळे दूर करण्याचे काम करते. त्यामुळे आहारात त्याचा समावेश करा.
5. जीवनसत्त्व बी ३
जीवनसत्त्व बी ३ मुळे चेहऱ्याची आद्रर्ता राखण्यास मदत होते. यामुळे चेहरा आतून हायड्रेट ठेवण्यास मदत होते. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्याचा भरपूर प्रमाणात सेवन करा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.