Monsoon Tips : पावसाळ्यात घरात उंदरांचा सुळसुळाट झालाय? न मारता पळवण्याचे भन्नाट उपाय

Home Remedies For Rats : पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे घरात मोठ्या प्रमाणात उंदीर घुसतात. त्यामुळे आपले आरोग्य देखील धोक्यात येते. वाढणारा उंदरांचा सुळसुळाट कमी करण्यासाठी घरगुती उपाय रामबाण ठरतात.
Home Remedies For Rats
Monsoon TipsSAAM TV
Published On

पावसाळ्यात दमट हवामानामुळे स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे लागते. कारण यावर आपले आरोग्य अवलंबून असते. पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे घरात उंदीर धुडगूस घालतात. वस्तूंचे नुकसान करातात. त्यांच्या विष्ठेमुळे घरात घाण, कुबट वास येऊन आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे आपण उंदरांना मारण्याच्या मागे लागतो. घरी उंदीर मारल्यास घरात वास येतो आणि किडे देखील पडतात. मात्र उंदरांना न मारताही तुम्ही घरातून पळवून लावू शकता.

उंदीर पळवण्याचे घरगुती उपाय

कांदा

पावसाळ्यात घरात उंदीर जास्त झाले असल्यास कांदा रामबाण उपाय आहे. कांद्याचा उग्र वास उंदरांना पळवून लावतो. उंदरांसाठी कांद्याचा वास विषारी असतो. घरात जिथे उंदीर फिरतात तिथे चिरलेला कांदा ठेवा. तसेच कांद्याचा रस करून देखील तुम्ही घराच्या कानाकोपऱ्यात आणि दरवाज्यावर शिंपडा. यामुळे उंदीर घरात शिरकाव करणार नाहीत.

लसूण

रोजच्या जेवणातील लसूण उंदरांना पळवून लावण्यास मदत करते. एका ग्लासात पाणी घेऊन लसूण किसून त्यात मिसळा. हे पाणी ज्या ठिकाणी उंदीर फिरतात त्या ठिकाणी शिंपडा. कारण उंदीर लसणापासून दूर पळतात. हे मिश्रण खूप प्रभावी असते.

लवंग

लवंग घरातील उंदीर दूर करण्यासाठी प्रभावी काम करते. लवंग कपड्यामध्ये बांधून घराच्या कानाकोपऱ्यात ठेवा. यामुळे उंदीरांची पैदास कमी होईल. तसेच यासाठी तुम्ही लवंगाचे तेल देखील वापरू शकता.

Home Remedies For Rats
Mop Cleaning : पावसाळ्यात घराची स्वच्छता करताना काळाकुट्ट झालेला मॉप मिनिटांत लागेल चमकू , वापरा 'ही 'सोपी ट्रिक

पुदिना

पुदिन्याच्या तीव्र वासाने उंदीर घरात येत नाहीत. पुदिन्याची पानं बारीक करून विशेषताः दरवाज्यावर ठेवावी. किंवा पुदिन्याचे पाणी स्प्रे बॉटलच्या मदतीने घरात शिंपडा. ज्यामुळे उंदरांचा त्रास कमी होईल.

'या' गोष्टींची काळजी घ्या

  • पावसाळ्यात घरामध्ये जास्त उंदीर होऊ नये, म्हणून घर स्वच्छ ठेवावे.

  • घरातील मोठं छिद्र असल्यास त्वरित ब्लॉक करा. जेणेकरून उंदीर आत शिरणार नाही.

  • घरात किचनच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. कारण उंदीर जेवणाला जास्त आकर्षक होतात.

  • रात्री उरलेले जेवण कधीही हवाबंद डब्यामध्ये ठेवावे.

  • तसेच घरात जमिनीवर खाली पडलेले अन्न त्वरित साफ करा.

  • रात्री उरलेले जेवण न चुकता झाकण लावून फ्रिजमध्ये ठेवा.

टीप : ही सामान्य माहिती आहे. आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही.

Home Remedies For Rats
Cooker Cleaning Tips : जळून काळाकुट्ट झालेल्या कुकर ५ मिनिटांत चकचकीत चमकेल; जेवणातील पदार्थ येतील उपयोगात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com