Skin Care Tips : चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल 'हा' योग !

Yoga For Skin: चेहरा,डोळे,घसा,छाती बोटे अशा शरीराच्या विविध अवयवांना या योगाचा फायदा होतो.
Skin Care Tips
Skin Care TipsSaam Tv
Published On

Asana For Skin : सिंहासन हा योगाचा एक प्रकार आहे या योगाच्या मदतीने तुम्हाला अनेक आरोग्याचे फायदे होतात. चेहरा,डोळे,घसा,छाती बोटे अशा शरीराच्या विविध अवयवांना या योगाचा फायदा होतो.

या योगाच्या मदतीने चेहऱ्यावरील रक्तभिसरण सुधारते आणि सुरकुत्या कमी करू शकते. कोणतेही केमिकल प्रॉडक्ट चा वापर न करता तुमच्या चेहऱ्यावरील चमक वाढवू शकता. तुम्ही हे आसन सकाळी रिकाम्या पोटी करू शकता किंवा दिवसभरातून कोणत्याही वेळी करू शकता.

Skin Care Tips
Yoga for white hair : पांढऱ्या केसांना पुन्हा काळे करायचे आहे ? 'ही' योगासने नियमित करा

1. सिंहासन योग किंवा सिंह मुद्रा कशी करावी

  • हे आसन करण्यासाठी तुम्ही पद्मासनाच्या आसनातही बसू शकता.

  • दुसरा मार्ग म्हणजे चटईवर हात पुढे ठेवा आता हळूहळू गुडघे बाजूला घ्या आणि थोडे पुढे वाकून बसा.

  • नंतर दोन्ही हात सरळ ठेवून आपले शरीर पुढे खेचा आणि तोंड उघडुन आता शक्य तितकी जीभ बाहेर काढा नाकातून श्वास घ्या आणि श्वास सोडताना 'ha' आवाज करा.

  • डोळे उघडे ठेवा या पोझमध्ये तुम्ही सिंहासारखे दिसाल 20 ते 30 सेकंद या आसनात राहा.

  • त्यानंतर पुन्हा करा चार ते पाच वेळा (Time) असे करावे लागते यानंतर रिलॅक्स बसा.

Simhasana Yog
Simhasana YogCanva

2. सिंहासनाचे फायदे

  • सिंहासन या आसनामुळे पाठीचा कणा मजबूत होतो. घशातील टॉन्सिल सारखे आजार (Disease) बरे करण्यासाठी हे आसन मदत करते.

  • नियमितपणे हा योगा (Yoga) केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात व स्नायूचा ढिलेपणा दूर होतो,डोळयाभोवती पडलेल्या सुरकुत्याही हळूहळू कमी होतात.

  • या आसनामुळे चेहऱ्यावरील रक्तभिसरण वाढण्यास मदत होते त्यामुळे चेहऱ्याची चमक अधिक वाढते आणि त्वचेच्या समस्या दूर होतात.

  • सिंहासन योग नियमितपणे केल्याने छाती आणि चेहऱ्यावरील ताण कमी करण्यास मदत होते. या आसनाच्या मदतीने दृष्टी वाढते.

  • तुम्हाला जर घशाच्या संबंधित समस्या असतील किंवा थायरॉईड असेल तर तुम्ही नियमितपणे हा योग करून ते आजार बरे करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com