kidney disease - सावधान! 'हे' दोन सामान्य आजार गपचूप खराब करत आहेत तुमची किडनी; सुरुवातीला दिसतच नाहीत लक्षणे

kidney disease symptoms - किडनी म्हणजे आपल्या शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव मानला जातो. शरीर निरोगी ठेवण्यासाठी किडनी अनेक महत्वाची काम करते.
kidney disease symptoms
kidney disease symptomssaam tv
Published On: 

किडनी आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव आहे. जो रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरीक्त घाण काढून टाकण्यास मदत करतो. परंतु आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीत अनेकांना खाण्यापिण्याच्या पद्धतीत होणाऱ्याबदलमुळे किडनीवर होण्याऱ्या परिणामांवर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. विषेशत: मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही किडनी खराब होण्याची प्रमुख कारणे आहेत.

kidney disease symptoms
kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

या आजारांना नियंत्रीत ठेवणे गरजेचे -

रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित राहिल्यास किडनीच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे त्या योग्य प्रकारे रक्त गाळू शकत नाहीत. तसेच उच्च रक्तदाबामुळे किडनीवरील ताण वाढतो आणि हळूहळू किडनीचे कार्य मंदावू लागते.

kidney disease symptoms
Banana : केळी खाल्ल्यानंतर किती लिटर पाणी प्यावे? ९०% टक्के लोक करतात ही चूक, आताच घ्या जाणून

लक्षणे सुरुवातीला न दिसणे

किडनीच्या आजाराची सर्वात मोठी समस्या म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे आजार मोठा झाल्यानंतरच बऱ्याचदा याची माहिती होते.

kidney disease symptoms
Toilet Cleaning : कमोडवरचे पिवळे डाग जाईना? या ट्रिक्सनं बाथरुम होईल चकचकीत

या आजारांवर हे उपाय करा -

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा: मधुमेह असणाऱ्यांनी नियमितपणे आपल्या साखरेची पातळी तपासावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य आहार व औषधोपचार घ्यावेत.

ब्लड प्रेशर आटोक्यात ठेवा: नियमितपणे रक्तदाब तपासावा आणि आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवावे.

आहार आणि जीवनशैलीत बदल करा

  • निरोगी आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिणे किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

  • धूम्रपान टाळा: धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, ज्यामुळे किडनीच्या आजारांचा धोका वाढतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com