Saam Tv
कमोडच्या डागांवर आधी बेकिंग सोडा शिंपडा. त्यावर थोडे पांढरे व्हिनेगर टाका. काही मिनिटे फेस होऊ द्या आणि नंतर टॉयलेट ब्रशने घासून स्वच्छ करा.
लिंबाच्या रसातील अॅसिडमुळे कमोडवरील पिवळे डाग कमी होतात. याशिवाय दुर्गंधी सुद्धा कमी होते. डाग असलेल्या भागांवर लिंबाचा रस लावून काही मिनिटांनी ब्रशने स्वच्छ करा.
बेकिंग सोड्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पिवळ्या डागांवर लावा आणि १० ते १५ मिनिटे ठेवा.
पिवळसर डाग असलेल्या भागावर पांढरे व्हिनेगर लावून काही वेळ तसेच ठेवा.नंतर टॉयलेट ब्रशने स्वच्छ करा. डाग काही दिवसातच गायब होतील.
कमोडच्या भांड्यातील पाणी काढल्यानंतर त्यावर थोडे गरम पाणी टाकल्यास मळ मऊ होतो आणि हळू हळू निघू लागतो.
पिवळे डाग खूप जुने होण्यापूर्वी कमोड नियमितपणे स्वच्छ करा. आठवड्यातून एकदा कमोडस्वच्छ केल्यास डाग कमी होऊ शकतात.
खूप जाडा आणि जुना डाग घरगुती उपायी निघण्याची शक्यता कमी असते. अशावेळी कमोडसाठी योग्य असलेले टॉयलेट क्लीनर वापरा.
व्हिनेगर, ब्लीच किंवा वेगवेगळे टॉयलेट क्लिनर एकमेकांमध्ये मिसळू नका. यामुळे त्वचेला इन्फेक्शन होऊ शकते.