Sideeffects of Oversleeping: सावधान ! सकाळी उशिरा उठणं देतं 'या' गंभीर आजारांना निमंत्रण

Oversleeping Effects: आपल्या आरोग्यासाठी ७ ते ८ तास झोप आवश्यक असते. परंतु, ८ तासांपेक्षा जास्त वेळ झोपल्यामुळे देखील आपल्या आरोग्याला गंभीर परिणाम होऊ शकतात.
Effects
Sideeffects of OversleepingCanva
Published On

आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं जातं, ' लवकर निजे लवकर उठे... पण हल्ली आपण सहजा सहजा लवकर झोपतच नाही आणि लवकर उठतच नाही.कित्येकांना रात्री उशिरा झोपण्याची सवय लागली आहे. तासनतास मोबाईल वर वेब सीरीज , शॉर्ट फिल्म्स, चित्रपट बघत राहतो. वेबसिरिसचं वेड तर इतकं लागतं की आपण ती पूर्ण बघितल्याशिवाय झोपतच नाही आणि पहाटे ४ ते ५ वाजेपर्यंत बघत बसतो आणि मग काय त्यादरम्यान झोपलो की थेट ११, १२ वाजताच उठतो. पण तुम्हांला माहितेय का उशिरा उठल्यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिकतेवर किती भयानक परिणाम होत असतात ? कधी तुम्हीं याचा एकांत मध्ये विचार केला आहे का ? आज या लेखद्वारे आपण जाणून घेऊ की,उशिरा उठल्यामुळे आपल्याला कित्येक गंभीर आजार होऊ शकतो.

Effects
Onion Health Benefits : पावसात नियमित करा कांद्याच्या रसाचे सेवन, सर्दी खोकल्यापासून लगेच मिळेल सुटका

पोट साफ न होणे

पोट साफ न झाल्यामुळे तुम्हांला पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे पचनक्रिया बिघडते परिणामी आपली प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे सकाळी लवकर उठणं गरजेचे आहे.

वजन वाढते

सकाळी उशिरा उठल्यामुळे आपण नियमित व्यायाम करत नाही आणि व्यायाम न केल्याने आपल्या शरीरात जी कॅलरीज बर्न होणे अपेक्षित असते ती होत नाही परिणामी ती आपल्या शरीरात साठून राहते आणि त्यामुळेच आपल्या शरीराचं वजन वाढतं आणि ह्या वाढत्या शरीराच्या वजनामुळे आपल्याला हृदयविकाराच्या समस्याला सामोरे जावं लागतं .

स्मरणशक्ती कमी होणे

कधी तुम्हीं विचार केला आहे का, उशिरा उठल्यामुळे आपल्याला या गंभीर समस्यालाही सामोरे जावं लागेल, उशिरा उठल्यामुळे किंवा अपुरे झोपेमुळे आपल्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे आपली स्मरणशक्तीही कमी व्हायला लागते. म्हणूनच डॉक्टर नियमित सात किंवा आठ तासाची झोप घेण्याचे सल्ले देतात.

ताण येणे

सकाळी उशिरा उठल्यामुळे आणि अपूरे झोपेमुळे दिवसभर चीड चीड होत या चिडचिडपणामुळे मानसिकतेवर आणि मनावर परिणाम होत असतो आणि आपलं कामात मन लागत नाही. त्यामुळे एंझायटी होण्याची शक्यता असते. सतत डोकेदुखी, अंगदुखीमुळे आपण मेडिसिन खातो या मेडिसिन चा विपरीत परिणाम आपल्या शरीरात होत असतो.

निरोगी आणि आणि आनंद आयुष्य जगण्यासाठी नियमित व्यायाम करा. स्थूलता, शुगर, हृदयविकार, एंझायटिंसारख्या गंभीर आजारापासून लांब राहायचं असेल तर रोज सकाळी लवकर उठा. सकाळी ताजी हवा घेतल्याने शरीरातील पेशी मजबूत होतात.

Effects
Health Benefits Of Copper : तांब्याचे चमत्कारी फायदे ऐकून व्हाल थक्क, आरोग्यासाठी आहे गुणकारी

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com