Shravan Diet 2024 : श्रावणात 'प्रोटीन' ची कमतरता भासते? 'हे' व्हेज पदार्थ देतील High Protein, दिवसभर राहाल उत्साही

Veg Protein Food : श्रावणात मांसाहार करत नसल्यामुळे शरीराला प्रोटीनची कमतरता भासू नये म्हणून आपल्या आहारात पौष्टीक प्रोटीनयुक्त व्हेज पदार्थांचा समावेश करावा.
Veg Protein Food
Shravan DietSAAM TV
Published On

श्रावण पावसात येत असल्यामुळे आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. पावसाळ्यात आपली पचनशक्ती मंदावते आणि मांसाहार पचायला देखील जड असतो. त्यामुळे त्यांचे सेवन करणे टाळावे. पण नॉनव्हेज पदार्थांतून आपल्याला जास्त प्रमाणात प्रोटीन मिळते. त्यामुळे श्रावणात प्रोटीनची कमतरता भासू नये आणि शरीर तंदुरुस्त रहावे. यासाठी व्हेज पदार्थांचा आहारात समावेश करावा.

शेंगदाणे

उपवासात शेंगदाणे मोठ्या प्रमाणात आपण खातो. पण ते खाताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे नाहीतर आरोग्याला धोका वाढतो. उपवासात शेंगदाणे खायचे असतील तर रात्री भिजत ठेवून सकाळी त्यांचे सेवन करावे. शेंगदाण्यांमध्ये असलेले प्रोटीन, व्हिटॅमिन ई आणि फायबर चांगल्या प्रमाणात लागते. शेंगदाणे खाल्ल्याने त्वचा, केस आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. उपवासात बिघडलेली पचनसंस्था सुधारते.

फुटाणे

उपवासात फुटाणे ळासोबत खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते. तसेच रक्तदाब नियंत्रित राहून वजन कमी होते. उपवासात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. फुटाण्यांमुळे रक्त शुद्ध होते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पचन चांगले होते. तसेच शरीरातील कॅलरीज कमी होतात. उपवासात याचे सेवन केल्यास अधिक काळ पोट भरलेले राहते.

मिल्क ओट्स

श्रावणात सकाळी दुधासोबत ओट्सचा नाश्ता करा. ओट्समुळे वजन नियंत्रणात राहते. हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच दुधामुळे उपवासात शरीराला ऊर्जा मिळते.

Veg Protein Food
Weight Loss : जास्त नाही तर कमी खाल्ल्याने वाढते वजन, वाचा वेट लॉस करण्याचे सिक्रेट

पनीर

पनीर कॅल्शियम , फायबर आणि व्हिटॅमिन्सचा उत्तम स्त्रोत आहे. शरीर मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी पनीर उपयुक्त ठरते.

दही

श्रावणात दह्यामधून तुम्ही खूप प्रोटीन मिळवू शकता. मात्र श्रावणात पाऊस असल्यामुळे दही खाताना ते जास्त थंड नाही ना याची काळजी घ्यावी. तसेच वारंवार देखील दही खाऊ नये. आठवड्यातून दोन वेळा दही खावे. पोटातील जळजळ कमी करण्यासाठी दही मदत करते.

सोयाबीन

पावसाळ्यात निरोगी त्वचेसाठी सोयाबीन खा. यामुळे त्वचेची पोत सुधारते. तसेच लांब आणि मजबूत केसांसाठी सुद्धा सोयाबीन उपयुक्त आहे. सोयाबीनमुळे वजन नियंत्रणात राहते. तसेच पोट देखील दीर्घकाळ भरलेले राहते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Veg Protein Food
Dental Health : पिवळ्या दातांमुळे मनमोकळं हसता येत नाही? फळांची साल करेल जादू, होतील पांढरेशुभ्र, मजबूत दात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com