Breaking News

Shravan 2025 : श्रावण महिना कधीपासून सुरू होतो? पूजा करताना टाळा ‘या’ चुका

Shravan Puja Rules : श्रावण ११ जुलैपासून सुरू होतो. या महिन्यात भगवान शिवाची पूजा करताना काही महत्त्वाच्या चुका टाळा आणि श्रद्धेने उपासना करा. सुख, समृद्धी आणि शांतता लाभेल.
Shravan 2025
Shravan Puja Rulesgoogle
Published On: 

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला प्रचंड महत्वाचे स्थान दिले जाते. श्रावण महिना हा भगवान शंकराला अर्पण केला जातो. या महिन्यात मांसहार टाळला जातो. तसेच उपवास केले जातात. त्याने आयुष्यात सुख शांती, समृद्धी आणि आशिर्वाद मिळतो. भारतात मोठ्या प्रमाणात लोक या महिन्यात उपवास करतात. चला तर जाणून घेऊ या महिन्याची तारिख आणि काही नियम.

Shravan 2025
GK : महाराष्ट्रातल्या 'या' गावात कपड्यांपासून तयार केले जातात कागद

श्रावण महिन्याची सुरुवात

यंदा म्हणजेच २०२५ मध्ये श्रावण महिन्याची सुरुवात जुलै ११ पासून होणार आहे. तर याचा शेवट श्रावण पौर्णिमेला ९ ऑगस्टला होणार आहे. याच दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे.

श्रावण सोमवार

श्रावण महिना हा शंकर देवाला समर्पित केला जातो. त्यामुळे या महिन्यातील सोमवारी भक्त कडक उपासना करतात. या महिन्यात भगवान शंकराची आणि पार्वतीची उपासना केली जाते. शिवलिंगाला पाणी, दूध आणि बेलपत्र अर्पण करतात. तसेच जलाभिषेक करतात.

पुढे श्रावण महिन्यात पूजा करताना कोणत्या चूका करू नयेत याबद्दल काही टीप्स दिल्या आहेत. त्याने तुम्ही चूका न करता तुमची भक्ती करून फळ मिळवू शकता.

टीप नंबर 1

शिवलिंगाची पूजा करताना कुंकूवाचा वापर करू नका. कारण शंकर भगवान हे एकांतवासी आहेत.

टीप नंबर 2

शंकराच्या पूजेच्या साहित्यात तुटलेल्या तांदळाचा वापर करू नका. हे तांदूळ अशुद्ध मानले जातात.

टीप नंबर 3

पूजा करणाऱ्याने मांस खाल्लेले नसावे.

टीप नंबर 4

पूजा करताना कधीही तुळशीच्या पानांचा वापर करू नका.

Shravan 2025
Rava Uttapam Recipe : रव्याचा उपमा खाऊन कंटाळलात? मग गरमा गरम उत्तपमची रेसिपी होऊन जाऊद्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com