Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रात अनेक लोक टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सध्या सोशल मीडियावर अशाच एका गावाबद्दल जोरदार चर्चा सुरु आहेत.
महाराष्ट्रातल्या कागजीपुरा या गावामध्ये जुन्या कपड्यांचे कागद बनवले जातात.
इतकेच नाही तर हे कागद ७०० वर्षे जुन्या कपड्यांपासून तयार केले जातात.
महाराष्ट्रातल्या कागद बनवणाऱ्या ठिकाणांपैकी हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे.
कागजीपुराला भारताचे ऐतिहासिक 'पेपर टाउन' सुद्धा म्हंटले जाते.
कागद तयार केल्यांनतर ते वर्षानुवर्षे तसेच राहतात. कारण ते धाग्यापासून तयार केले जातात.
सध्या मार्केटमध्ये हॅंडमेड आर्टची खरेदी कमी केली जाते. त्याने अशा जुन्या आणि टाकाऊ गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत नाहीत.