Sakshi Sunil Jadhav
नाश्त्याला काही हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही रव्याचा उत्तपमची रेसिपी लगेचच करा.
रवा, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, तेल, मीठ इ.
सर्वप्रथम सर्व भाज्या बारिक चिरून घ्या.
एका भांड्यात रवा, पाणी, मीठ आणि दही मिक्स करून बॅटर तयार करा.
बॅटर काही तास भिजत ठेवा. त्याने उत्तपम छान फुलेल.
आता तुम्ही तयार बॅटर गरम तव्यावर पसरवून घ्या.
तव्यावरच्या बॅटरवर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची पसरवा आणि त्यावर झाकन ठेवा.
दोन्ही बाजूने उत्तपम शेकवा आणि नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.