Shardiya Navratri Recipe 2022 : देवी ब्रम्हचारीणीला प्रसन्न करण्यासाठी 'या' पदार्थाचा भोग लावा, बनेल झटपट !

या नऊ दिवसात नवदुर्गेला प्रसन्न करण्यासाठी तिला तिच्या आवडीचा प्रसाद अर्पण केला जातो.
Shardiya Navratri Recipe 2022
Shardiya Navratri Recipe 2022Saam Tv

Shardiya Navratri Recipe 2022 : हिंदू धार्मिक सणांमधील नवरात्री उत्सवाला अधिक महत्त्व आहे. या नऊ दिवसांत नवदुर्गेची पूजा केली जाते. आजपासून नवरात्री (Navratri) उत्सवाला सुरुवात झाली आहे. आज देवी शैलपुत्रीची पहिली माळ असून उद्या दुसरी माळ आहे.

उद्या देवी ब्रम्हचारीणीचा दिवस असून ही तिची मनोभावे पूजा केली जाते. तिला भक्ती आणि तपश्चर्येची माता म्हणूनही ओळखले जाते. तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी साखरेचे पदार्थ अर्पण केला जातो. तिचे हे रूप देवी पार्वतीचे प्रतीक आहे जेव्हा ती भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्षे ध्यानात गुंतलेली होती. तिच्या उजव्या हातात जपमाळ (रुद्राक्ष माळ) आणि डाव्या हातात कमंडलू असलेली पांढरी वस्त्रे सजलेली आहेत. तिचा आवडता रंग लाल आहे.

या नऊ दिवसात नवदुर्गेला प्रसन्न करण्यासाठी तिला तिच्या आवडीचा प्रसाद अर्पण केला जातो. नऊ दिवसात नवदुर्गेचा उपवास केला जातो. या दिवसात कोणते उपवासाचे पदार्थ (Food) बनवायला हवे हे जाणून घेऊया.

Shardiya Navratri Recipe 2022
Navratri Fast Low Calorie Food : नवरात्रीच्या नऊ दिवसात उपवासाचे 'हे' पदार्थ खा, राहाल फिट !

शिंघाड्याच्या पिठाचा हलवा

साहित्य -

शिंघाड्याचे पीठ - १ कप

तूप - ४ चमचे

साखर - ३/४ वाटी

वेलची पावडर - १/२ चमचा

बदाम व पिस्ता काप - १ चमचा

साहित्य -

-एका बोर्ड नॉन-स्टिक पॅनमध्ये तूप गरम करा, त्यात शिंघाड्याचे पीठ घाला आणि मंद आचेवर ४ मिनिटे किंवा हलका तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.

- त्यानंतर त्यात २ कप कोमट पाणी घाला, चांगले ढवळून आणि मंद आचेवर आणखी ४ मिनिटे शिजवा किंवा सर्व पाणी शोषले जाईपर्यंत, सतत ढवळत राहा.

Shardiya Navratri Recipe 2022
Navratri Special Recipe 2022 : नवरात्रीच्या उपवासात खा; 'हा' स्पेशल रायता, अपचनाची समस्या होईल दूर !

- साखर घालून चांगले मिसळा आणि सतत ढवळत असताना मंद आचेवर आणखी ४ मिनिटे शिजवा.

- गॅस बंद करून त्यात वेलची पूड घाला आणि मिक्स करा.

- वरुन बदाम व पिस्त्याचे काप घालून देवीला अर्पण करा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com