

हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेल्या नवरात्रीला यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून 23 ऑक्टोबर रोजी संपत आहे. नवरात्रीमध्ये संपूर्ण नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्री देवीची पूजा केली जाते.
शारदीय नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा (Puja) केली जाते. माता दुर्गेच्या या रूपाला शुभंकारी असेही म्हणतात. ही देवी वाईटाचा नाश करून शुभ फल देणारी म्हणून ओळखली जाते.
तीन नेत्र असलेली देवी कालरात्रीची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात. असे मानले जाते की नवरात्रीच्या (Navratri) सातव्या दिवशी भक्तांनी माता कालरात्रीची पूजा योग्य पद्धतीने केल्यास त्यांचे सर्व संकट दूर होतात. तिची पूजा केल्याने भीती, संभ्रम आणि रोग दूर होतात. चला तर मग कालरात्रीची पूजा पद्धत आणि मंत्र (Mantra) पाहूयात.
माता कालरात्रीच्या पूजेचे महत्त्व
धार्मिक मान्यतांनुसार माता कालरात्रीची पूजा केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात. तंत्र मंत्राचे अभ्यासक विशेषतः कालरात्रीची पूजा करतात. त्याचबरोबर देवी कालीची पूजा केल्याने मनुष्य भयमुक्त होतो. असेही मानले जाते की माता काली आपल्या भक्तांचे अकाली मृत्यूपासून रक्षण करते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
माता कालरात्री पूजन पद्धत
तुम्ही इतर दिवसांप्रमाणे नवरात्रीच्या सप्तमी तिथीची पूजा करू शकता, परंतु मध्यरात्री ही देवी कालीची पूजा करण्यासाठी सर्वात योग्य वेळ मानली जाते. अशा स्थितीत सर्व प्रथम पूजास्थानाची पूर्ण स्वच्छता करून त्यावर लाल रंगाचे कापड पसरून माता कालरात्रीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे. पूजेच्या वेळी माँ कालिकाला रातराणीची फुले अर्पण करा. नैवेद्य म्हणून गूळ द्यावा. यानंतर कापूर किंवा दिव्याने मातेची आरती करावी. यानंतर लाल चंदनाच्या माळाने माँ कालरात्रीच्या मंत्रांचा जप करावा.
कालरात्री मंत्र
ॐ कालरात्र्य नमः
ॐ फट् शत्रून साघय घातय ॐ
ॐ ह्रीं श्रीं क्लीं दुर्गतिनाशिन्यै महामायायै स्वाहा
या देवी सर्वभूतेषु कालरात्रि रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥
ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे।
ध्यान मंत्र
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता, लम्बोष्टी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी। वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा, वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी॥
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.