Shardiya Navratri 2023 :उपवासात हेल्दी समजून हे पदार्थ खाताय? या गोष्टी लक्षात ठेवा, वाढू शकते वजन

Fast Food On Health : शरीरासाठी एनर्जीने भरलेले आणि निरोगी ठेवण्यासाठी आपण काही पदार्थाचे सेवन करतो पण ते हेल्दी आहेत का?
Shardiya Navratri 2023
Shardiya Navratri 2023 Saam Tv
Published On

Navratri Vrat Food :

नवरात्री म्हटलं की, रंगासोबत अनेक पदार्थांची चव चाखली जाते. या काळात अनेक जण नऊ दिवस उपवास ठेवतात. उपवास करणे आरोग्याला फायदेशीर मानले जाते.

प्रत्येकासाठी उपवासाचे वेगळे महत्त्व आहे. काही लोक उपवास ठेवतात ज्यामुळे शरीर डिटॉक्स होऊ शकते. परंतु, या दिवसात खरोखर निरोगी खाणे शक्य आहे का? शरीरासाठी एनर्जीने भरलेले आणि निरोगी ठेवण्यासाठी आपण काही पदार्थाचे सेवन करतो पण ते हेल्दी आहेत का? त्याचे प्रमाण किती असायला हवे? अतिरिक्त सेवन केल्यास अपचन आणि पोटदुखीची समस्या होते.

1. कुट्टू

उपवासाच्या (Vrat) काळात आपण कुट्टूचे पदार्थ खातो. रक्त शुद्ध करण्यात मदत होते. १०० ग्रॅम कुट्टूमध्ये 323 कॅलरीज असतात. हा प्रोटीनचा एक चांगला स्त्रोत आहे. नवरात्रीच्या काळात सतत याचे सेवन करु नका, यामुळे रक्तदाब कमी होतो. यामध्ये साखरेचे (Sugar) प्रमाण कमी असते. ज्यामुळे ऊर्जेची पातळीही कमी होते.

Shardiya Navratri 2023
Masala Daliya Khichadi Recipe : स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला? ट्राय करा मऊसुत दलिया मसाला खिचडी, पाहा रेसिपी

2. वॉटर चेस्टनट

हा पदार्थ सूपरफूड मानला जातो. यामध्ये कमी कॅलरी असते. हे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. यात अंदाजे ७४ टक्के पाणी असते. याचे अतिरिक्त सेवन केल्यास कफ होण्याची शक्यता असते.

3. साबुदाणा

उपवासात सगळ्यात आधी खाल्ला जातो तो साबुदाणा. यामध्ये स्टार्च अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे पाण्याची (Water) तहान जास्त लागते. भिजवून नीट शिजल्यानंतर खा. कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्यामुळे कमी प्रमाणात सेवन करा. अतिप्रमाणात सेवन केल्यास उच्च रक्तदाबाची समस्या होऊ शकते.

Shardiya Navratri 2023
Most Dangerous Fort In Nashik : सह्याद्रीच्या कुशीत वसलेला नाशिकमधील भयावह किल्ला, निसर्गाचं सौंदर्य पाहून पर्यटकांना पडते भुरळ!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com