Shardiya Navratri Day 8 : आठवी माळ, अष्टमीला महागौरीची अशी करा पूजा, विश्वाला नवचैतन्यमय करणारी देवी

Ashtami Is The Eighth Day Of Navratri : माता महागौरीची पूजा केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि देवी सर्व चुका माफ करते अशी मान्यता आहे.
Shardiya Navratri Day 8
Shardiya Navratri Day 8Saam Tv
Published On: 

Shardiya Navratri 2023 :

नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचा आठवा दिवस म्हणजेच अष्टमी 22 ऑक्टोबरला आहे. याला महाअष्टमी आणि दुर्गाष्टमी असेही म्हणतात. या दिवशी महागौरी मातेच्या आठव्या शक्तीची पूजा केली जाते. माता महागौरीची पूजा केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि देवी सर्व चुका माफ करते अशी मान्यता आहे.

नवरात्रीमध्ये अष्टमी तसेच नवमीला विशेष महत्त्व (Importance) आहे. या दिवशी संपूर्ण विधीपूर्वक मातेची पूजा केल्यास दुप्पट फळ प्राप्त होते. या दिवशी मातेची पूजा केल्यानंतर लोक मुलींचीही पूजा (Puja) करतात. चला तर मग जाणून घेऊया अष्टमीच्या दिवशी देवीची पूजा कशी करावी, जाणून घेऊया तिचा मंत्र, शुभ रंग आणि महत्त्वाची माहिती.

देवी महागौरीचे रूप

बैलावर स्वार होणार्‍या मातेचा रंग अतिशय गोरा आहे, म्हणून दुर्गेच्या या अवताराला महागौरी म्हणतात. मातेला चार हात आहेत, त्यापैकी एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात डमरू आहे. तिसरा आणि चौथा हात अभय आणि वरद मुद्रामध्ये असतो. महागौरी ही करुणा, वात्सल्य आणि शांत स्वभावाने परिपूर्ण आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shardiya Navratri Day 8
Shardiya Navratri 2023 : नवरात्रीनंतर कलशातील पाणी आणि नारळाचा असा करा वापर, दुर्गा देवी राहिल नेहमी प्रसन्न

देवी महागौरीचा आवडता रंग

देवी महागौरीला जांभळा रंग (Color) खूप प्रिय आहे. अष्टमीच्या दिवशी जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून मातेची पूजा करावी.

देवी महागौरीचे आवडते फूल

पूजेमध्ये महागौरीला मोगऱ्याचे फूल अर्पण करा कारण देवी गौरीला हे फूल खूप आवडते. तसेच देवीला नारळ अर्पण केल्याने माता प्रसन्न होते आणि इच्छित आशीर्वाद देते.

Shardiya Navratri Day 8
Shardiya Navratri 2023 : कोल्हापूरची अंबाबाई ते वैष्णो देवी... देशभरात प्रसिद्ध आहेत नवदुर्गेची ही मंदिरे; दर्शन घ्या

देवी महागौरीची आरती

''जय महागौरी जगत की माया ।

जय उमा भवानी जय महामाया ॥

हरिद्वार कनखल के पासा ।

महागौरी तेरा वहा निवास ॥

चंदेर्काली और ममता अम्बे

जय शक्ति जय जय मां जगदम्बे ॥

भीमा देवी विमला माता

कोशकी देवी जग विखियाता ॥

हिमाचल के घर गोरी रूप तेरा

महाकाली दुर्गा है स्वरूप तेरा ॥

सती 'सत' हवं कुंड मै था जलाया

उसी धुएं ने रूप काली बनाया ॥

बना धर्म सिंह जो सवारी मै आया

तो शंकर ने त्रिशूल अपना दिखाया ॥

तभी मां ने महागौरी नाम पाया

शरण आने वाले का संकट मिटाया ॥

शनिवार को तेरी पूजा जो करता

माँ बिगड़ा हुआ काम उसका सुधरता ॥

'चमन' बोलो तो सोच तुम क्या रहे हो

महागौरी माँ तेरी हरदम ही जय हो'' ॥

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.