Lord Shiva Favourite Plants : आषाढ महिन्यात कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर महादेवाची कृपादृष्टी राहिल; अंगणात लावा ही फुलं

Spirituality : उपवासासह महादेवाची मनोभावे आराधना करणाऱ्या व्यक्तींनी काही ठरावी प्रकारच्या वनस्पती आपल्या अंगणात लावाव्यात.
Spirituality
Lord Shiva Favourite PlantsSaam TV

हिंदू धर्मात आषाढ महिना फार भाग्याचा आणि पावित्र्याचा मानला जातो. हा महिना महादेवाला समर्पित देखील आहे. त्यामुळे हा महिना संपण्याआधी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी व्यक्ती विविध उपवास करतात. उपवासासह महादेवाची मनोभावे आराधना करणाऱ्या व्यक्तींनी काही ठरावी प्रकारच्या वनस्पती आपल्या अंगणात लावाव्यात.

Spirituality
Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

पावसाळ्यात सर्वत्र घनदाट झाडी आणि हिरवळ पसरण्यासाठी पोषक वातावरण असते. विविध धान्यांसह वक्ष आणि फुलांची झाडे देखील या काळात छान वाढतात. तसेच दारात काही ठरावीक वनस्पती आणि झाडे असल्याने महादेव देखील प्रसन्न होतात. त्या घरात सुख, शांती नांदते आणि प्रगती होते. त्यामुळे त्या झाडांची नावे जाणून घेऊ.

लाजाळू

लाजाळू ही एक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या पानांना स्पर्ष केल्यावर ती पाने एकमेकांना चिकटतात. महादेवाला ही वनस्पती फार प्रिय आहे. त्यामुळे धार्मिकरित्या देखील या वनस्पतीला महत्व प्राप्त झालंय. या वनस्पतीत अनेक औषधी गुणधर्म आढळतात.

चंपा फुल

चंपा हे अतिशय सुंदर आणि सुगंधीत फुल आहे. शंकर देवाच्या पुजेवेळी चंपा फुलं अर्पण केली जातात. ही फुलं सुद्धा शंकर देवाला फार आवडतात. त्यामुळे घरामध्ये एका छोट्याशा कुंडीत या फुलांचं झाड तुम्ही लावू शकता. तसेच पुजेवेळी याला येणारी फुलं तुम्ही वापरू शकता.

बेलपत्र

महादेवाच्या पुजेसाठी बेलाची पाने फार महत्वाची असतात. महादेवाच्या प्रत्येक पुजेमध्ये बेलपत्रांना मोठं स्थान आहे.बेलपानांशीवय ही पूजाच अपूर्ण असते. त्यामुळे तुम्ही घराबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत बेलफळ लावू शकता. बेल फळ खाण्याचे देखील आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत.

पिंपळाचं झाड

पिंपळाच्या झाडाला आयुर्वेदात फार महत्वाचं स्थान आहे. कारण हे एकमेव असं झाडं आहे जे दिवसा आणि रात्री सुद्धा ऑक्सिजन देतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरापासून काही अंतरावर हे झाड लावले पाहिजे. महादेवाच्या पुजेवेळी सुद्धा पिंपळाच्या पानांचा वापर केला जातो.

Spirituality
Mahadev Betting App Case: महादेव बेटिंग घोटाळ्यात जर्मन कनेक्शन उघड, अॅपवर ७ जणांचं नियंत्रण, नावं आली समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com