Mahadev Betting App Case: महादेव बेटिंग घोटाळ्यात जर्मन कनेक्शन उघड, अॅपवर ७ जणांचं नियंत्रण, नावं आली समोर

Mahadev Betting App Money Laundering Case: महादेव बेटिंग अॅप घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी सात जणांचं अॅपवर नियंत्रण असल्याचा मोठा खुलासा ईडीने केला आहे.
Mahadev App Case: महादेव बेटिंग अॅप घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट
Mahadev Betting Case: 7 Men Controls Mahadev Online App Says EDYandex

महादेव बेटिंग अॅप घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सात जणांच्या गटाने महादेव ऑनलाइन बुकच्या कथित बेकायदेशीर ऑपरेशन्सवर नियंत्रण ठेवलं होतं, असं अंमलबजावणी संचालनालयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव ऑनलाइन बुक ६ ते ७ जणांच्या नियंत्रणाखाली सहकारी संस्थेप्रमाणे तयार करण्यात आले होते.

आतापर्यंत सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल हे दोघे याप्रकरणी सूत्रधार असल्याचं वाटत होतं. परंतु, ईडीने याप्रकरणी (Mahadev Betting Case Update) आता जर्मन नागरिक लार्क मार्शल आणि चार भारतीय, रतन लाल जैन, हरी शंकर तिब्रेवाल, गिरीश तलरेजा आणि शुभम सोनी उर्फ ​​पिंटू भैय्या या चौघांची नावं समोर आणली आहेत. सध्या सुरू असलेल्या तपासानुसार पाच जणांनी त्यांची नावं तपासापासून दूर ठेवण्यासाठी कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना ७६ लाख रूपये दिले होते.

Mahadev App Case: महादेव बेटिंग अॅप घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट
Mahadev App Case: महादेव बेटिंग अ‍ॅप घोटाळा प्रकरण, १००० कोटींची केली होती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक; ईडीकडून माहिती

तपास यंत्रणांनी साक्षीदार म्हणून त्यांची नावे तपासापासून दूर ठेवावेत म्हणून त्यांनी असं पाऊल उचललं असल्याचं ईडीने सांगितलं आहे. ईडी अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की, लार्क मार्शलने सट्टेबाजी ॲपची रचना (Mahadev Betting Case) केली. त्यावेळी दैनंदिन कामकाज, महसूल निर्मिती, व्यवहार आणि बेकायदेशीर सट्टेबाजीच्या क्रियाकलापांमधून निर्माण होणाऱ्या नफ्यावर सहा भारतीय लोकांचं नियंत्रण होतं. हा १५०० कोटींचा घोटाळा असल्याची माहिती मिळत आहे.

ईडीला तपासामध्ये (Mahadev Online Book) पुढील माहिती समजली आहे. २०२२ मध्ये या ऑपरेशनची चौकशी सुरू झाली होती. तपास यंत्रणांनी याप्रकरणी चौकशी केल्यास त्याचा संपूर्ण दोख चंद्रकर आणि उप्पल यांच्यावर टाकला जावा, असा कट महादेव अॅपच्या ऑपरेटर्सनी रचला होता. इतर पाच नियंत्रकांची नावे बाहेर येऊ नयेत, म्हणून छत्तीसगड पोलिसांना ७६ लाख रूपये (crime news) दिले, असं ईडी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.रविवारी याप्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक करण्यात आली होती.

Mahadev App Case: महादेव बेटिंग अॅप घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट
Mahadev App Case: महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणाचं लोण महाराष्ट्रात पोहोचलं; 70 जणांसह बडा व्यापारी पोलिसांच्या ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com