Palghar News : खैर जातीची झाडे तोडून परस्पर विक्री; चार जणांवर गुन्हा दाखल, वन कायद्यांतर्गत कारवाई

Wada News : वनेत्तर वापरास बंदी असा उल्लेख असलेल्या सात बाराची मालकी व देवस्थान इनामीची विक्रीस अपात्र असलेल्या जमीनवरील झाडे तोडण्यात आली आहेत
Palghar News
Palghar NewsSaam tv
Published On

फय्याज शेख 

वाडा (पालघर) : महाराष्ट्र खासगी वन (वनसंपादन) वनेत्तर वापरास बंदी असा उल्लेख असलेल्या सात बाराची मालकी व देवस्थान इनामीची विक्रीस अपात्र असलेल्या जमीनवरील खैर जातीच्या झाडाची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आल्याचे निदर्शनास आले. झाडे तोडून वन आधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने परस्पर विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत वन कायद्यांतर्गत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Palghar News
Water Training Video : वाहत्या पाण्यात समुहाने अडकलात तर कसा वाचवाल जीव? हवामान तज्ज्ञांनी शेअर केला VIDEO

पालघर (Palghar) जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वन परिक्षेत्र पुर्व यांच्या कार्यक्षेत्रात हि जमीन आहे. मौजे निशेत सर्व्हे नंबर २७/२ ची सात बारा असलेली व महाराष्ट्र खासगी वन (वनसंपादन) वनेत्तर वापरास बंदी असा उल्लेख असलेल्या सात बाराची मालकी व देवस्थान इनामीची विक्रीस अपात्र असलेल्या जमीनवरील झाडे तोडण्यात आली आहेत. विशेष म्हणजे वन विभागाची (Forest Department) कोणतीही परवानगी न घेता या जमीनवरील खैर जातीच्या महागड्या झाडांची कत्तल करून ती वन विभागाच्या अधिकाऱ्यासह कर्मचारी यांच्या संगनमताने परस्पर विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.  

Palghar News
Weather Forecast : राज्यात पुढचे ५ दिवस तुफान पाऊस; हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट, वाचा वेदर रिपोर्ट

सदरची बाब वन विभागाच्या निदर्शनास आली. यानंतर देवस्थान असलेल्या गावातील नागरिकांनी याबाबत वाडा वन विभाग पुर्व कार्यालयात याबाबत लेखी तक्रार करण्यात आली होती. तक्रारी नंतर वन विभाग खडबडून जागे झाले. यानंतर वन विभागाच्या पथकाने सदर जागेवर जाऊन पंचनामा केला. याचा पूर्ण तपस करून झाडे तोडणारे व यात सहभाग असलेल्या चार जाणांविरोधात वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com