Saving Account Interest : बचत खात्यावर मिळतेय सर्वाधिक व्याज दर, त्यातील 'या' आहेत त्या 4 बँका

महागाई वाढल्याने बचत खात्यावरील व्याजदर कमी झाले आहेत
Saving Account Interest
Saving Account InterestSaam Tv
Published on: 
Saving Money
Saving Money Canva

वाढत्या महागाईच्या काळात बँक खात्यावर किती व्याज मिळते हे पाहणे महत्त्वाचे आहे. बचत खात्यावर मिळणारे व्याज देखील एक प्रकारची कमाई आहे. मात्र महागाई वाढल्याने बचत खात्यावरील व्याजदर कमी झाले आहेत. यामुळे बचतीवरील कमाई नकारात्मक झाली आहे. मात्र, अलीकडे काही बँकांनी (Bank) दर वाढवले ​​आहेत. (Latest Marathi News)

Saving Account Interest
Bank Job : या बँकेत पदवीधरांना मिळणार नोकरीची संधी; १६७३ जागा रिक्त, पगार ६० हजारपेक्षा जास्त
SBI Bank
SBI BankCanva

काही दिवसांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाने बचत खात्यावरील व्याजदरात बदल केला आहे. 10 कोटींहून अधिक ठेवींसाठी ही दुरुस्ती करण्यात आली आहे. बचत खात्यात 10 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम ठेवल्यास स्टेट बँक 3% व्याज देत आहे. 10 कोटींपेक्षा कमी रकमेवर 2.7% व्याज मिळत आहे.

HDFC Bank
HDFC BankCanva

HDFC बँकेने 6 एप्रिल 2022 पासून बचत खात्याचे व्याजदर बदलले आहेत. ही बँक 50 लाखांपेक्षा कमी ठेवींवर 3% व्याज देत आहे. 50 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींवर 3.50 टक्के व्याज दिले जात आहे. एचडीएफसी बँक दररोज खात्यात (Account) ठेवलेल्या रकमेवर व्याज मोजते.

Saving Account Interest
RBI Cancels Bank Licence: रिझर्व्ह बँकेकडून आणखी एका बँकेचं लायसन्स रद्द, तुमचं 'या' बँकेत पैसे असतील तर त्याचं काय होणार?
ICICI Bank
ICICI BankCanva

ICICI बँकेने बचत खात्याचे व्याजदरही बदलले आहेत. खात्यात जमा होणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या शिल्लक रकमेच्या आधारावर व्याज मोजले जाते. या बँकेनुसार, दिवसाअखेर खात्यात 50 लाख रुपये शिल्लक असल्यास त्यावर 3% व्याज दिले जाईल. 50 लाखांवरील ठेव रकमेवर 3.50 टक्के व्याज मिळेल.

Punjab National Bank
Punjab National BankCanva

इतर बँकांप्रमाणेच पंजाब नॅशनल बँकेनेही बचत खात्यावरील व्याजदरात सुधारणा केली आहे. PNB 10 लाख रुपयांपेक्षा कमी ठेवींवर ग्राहकांना 2.7% व्याज देत आहे. 10 लाखांपेक्षा जास्त ठेवींवर 2.75 टक्के व्याज दिले जात आहे. PNB चे नवीन दर 4 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.