Samsung Galaxy S24 Series च्या प्री-बुकिंगला सुरुवात, मिळतोय २२ हजारांचा डिस्काउंट

Samsung Galaxy S24 Features : Samsung चा फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S24 सिरीज भारतातही लॉन्च झाला आहे. कंपनीने त्याची भारतातील किंमतीही जाहीर केल्या आहेत. तसेच आज दुपारी १२ वाजल्यापासून स्मार्टफोनच्या प्री बुकिंगला सुरुवात झाली आहे.
Samsung Galaxy S24 Series
Samsung Galaxy S24 SeriesSaam Tv
Published On

Samsung Galaxy S24 Series Pre Booking :

Samsung चा फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S24 सिरीज भारतातही लॉन्च झाला आहे. कंपनीने त्याची भारतातील किंमतीही जाहीर केल्या आहेत. तसेच आज दुपारी १२ वाजल्यापासून स्मार्टफोनच्या प्री बुकिंगला सुरुवात झाली आहे.

या सीरीजमध्ये सॅमसंगने Galaxy S24, Galaxy S24+ आणि Galaxy S24 Ultra हे तीन स्मार्टफोन (Smartphone) लॉन्च केले आहेत. अशातच सॅमसंगने मागच्या वर्षीच्या तुलनेत नवीन सीरिजच्या डिझाइनमध्ये कोणाताही बदल केलेला नाही. परंतु, या फोनच्या फीचर्समध्ये अनेक अपग्रेड्स पाहायला मिळणार आहेत.

सॅमसंगच्या या सीरिजच्या प्री- बुकिंगवर २२ हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. जाणून घेऊया सॅमसंग सीरीजच्या किंमती (Price) आणि ऑफर्सबद्दल (Offer).

Samsung ची ही नवीन सीरीज AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स फीचर असणार आहे. याशिवाय यामध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे. या सीरीजमध्ये स्मार्टफोन 8GB/12GB रॅम आणि 256GB/512GB/1TB स्टोरेजला सपोर्ट करेल. या सीरीजमध्ये अल्ट्रा मॉडेल टायटॅनियम बॉडीसह येते आणि 200MP फ्रंन्ट कॅमेरा आहे. तसेच यात कॅमेरा सेन्सरमध्येही बदल दिसणार आहेत.

Samsung Galaxy S24 Series
Tata Punch EV: टाटा पंच इलेक्ट्रिक कार आली! २ वेगवेगळ्या बॅटरी पॅक, ४२१ किमी रेंज; २१००० रुपयांत बुक करता येणार

1. Samsung Galaxy S24 Series ची भारतात किंमत किती?

Samsung Galaxy S24 मध्ये दोन प्रकारचे स्टोरेज येत आहेत. यामध्ये 8GB RAM + 256GB आणि 8GB RAM 512GB याच्या बेस व्हेरिएंटची किंमत ७९,९९९ रुपये आहे तर त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत ८९,९९९ रुपयांना मिळेल. हा फोन तुम्ही तीन रंगामध्ये उपलब्ध आहे. यावर ग्राहकांना 15,000 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे.

Samsung Galaxy S24+ मध्ये देखील दोन प्रकारचे स्टोरेज मिळणार आहे. 12GB RAM + 256GB आणि 12GB RAM 512GB याच्या बेस व्हेरिएंटची किंमत ९९,९९९ रुपये आहे तर त्याचा टॉप व्हेरिएंटची किंमत १,०९,९९९ रुपयांना मिळणार आहे. यात 10 हजार रुपयांपर्यंतची स्टोरेज अपग्रेड ऑफर उपलब्ध असेल.

Samsung Galaxy S24 Series
Google ने Play Store वरुन हटवले ९ अ‍ॅप्स, तुमच्या फोनमध्ये आहेत का? चेक करा

Samsung Galaxy S24 Ultra या फोनमध्ये युजर्सना तीन प्रकारचे स्टोरेज मिळत आहे. 12GB RAM + 256GB, 12GB RAM + 512GB आणि 12GB RAM + 1TB आहे. यामध्ये तीन रंगाचे पर्याय उपलब्ध आहेत. बेस व्हेरिएंटची किंमत १,२९,९९९ रुपये तर इतर दोघांची १,३९,९९९ रुपये आणि १,५९,९९९ रुपये आहे. यामध्ये 12 हजार रुपयांपर्यंतची स्टोरेज अपग्रेड ऑफर उपलब्ध असेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com