Salt Side Effects : थांबा थांबा! तुम्हीही जास्त मीठ असलेलं जेवण खाताय? आरोग्यावर होणारे दुष्परिणाम वाचा

Health Tips : पदार्थावरून मीठ खाणे किंवा पदार्थात जास्त मीठ असल्यास असे पदार्थ खाल्ल्यने त्याचा आरोग्यावर उलट परिणाम होतो. आपल्या शरीरातील आजार आणखी वाढू लागतात.
Health Tips
Salt Side EffectsSaam TV

जेवणाची चव वाढवण्यासाठी प्रत्येक पदार्थात मीठ असणे गरजेचं आहे. मीठ नसल्यास त्या पदार्थाची चांगली चव लागत नाही. जेवणात मीठ जास्त झाल्यावर देखील पदार्थ खारट लागतात, चव पूर्ण बिघडते. काही व्यक्तींना जेवणावरून मीठ टाकून खाण्याची देखील सवय असते.

मात्र तुम्हाला माहिती आहे का? आपण आळणी पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. त्याच उलट पदार्थावरून मीठ खाणे किंवा पदार्थात जास्त मीठ असल्यास असे पदार्थ खाल्ल्यने त्याचा आरोग्यावर उलट परिणाम होतो. आपल्या शरीरातील आजार आणखी वाढू लागतात. त्यामुळे आज आहारात जास्त मीठ किंवा जास्त खारट पदार्थ खाण्याचे दुष्मपरिणाम सविस्तर जाणून घेऊ.

उच्च रक्तदाबाचा त्रास

जेवणात किंवा अन्य स्नॅक्स असलेल्या ज्या पदार्थांमध्ये जास्त मीठ असते ते पदार्थ खाऊ नयेत. कमी मीठ असलेले पदार्थ खावेत. जास्त मीठ खाल्ल्याने वयाची ४० शी ओलांडल्यावर लगेचच काही व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो.

किडनी स्टोन

जास्त मीठाचं सेवन करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरात कॅल्शीअमचं प्रमाण जास्त वाढतं. त्यामुळे युरीन संबंधीत समस्या वाढतात आणि त्या व्यक्तींना किडनी स्टोन होतात. किडनी स्टोन झालेल्या व्यक्तींनी आजपासूनच जेवणातील मिठाचं प्रमाण पूर्णता कमी केलं पाहिजे.

हृदयाचे आजार

मीठ जिभेचे चोचले पुरवत असलं तरी ते आपल्या हृदयाला हानी पोहचवत असतं. अनेक व्यक्ती सफरचंद, द्राक्ष, पेर अशा फळांवर वरून मीठ टाकून खातात. मात्र असे केल्याने त्याचा थेट परिणाम तुमच्या हृदयावर होतो. जेवणात आणि फळांवर देखील प्रति दिवस ५ ग्रामहून कमी मिठाचे तुम्ही सेवन कराल याची काळजी घ्या. अन्यथा मिठामुळे आजार जास्त वाढून तुम्हाला जीव देखील गमवावा लागू शकतो.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. मिठासंदर्भात या सर्व गोष्टींचा साम टीव्ही दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com