Oil Leaking of Tiffin : स्टिलच्या डब्ब्यातून भाजीचं तेल बाहेर येतंय? मग आजपासूनच 'या' टिप्स फॉलो करा

Oil Leaking of Tiffin : जर तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल तर काय करावे यावर देखील आम्ही उपाय शोधला आहे. जर तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल तर घरामध्ये असलेले १० ते १२ रबब एकत्र घ्या.
Oil  Leaking of Tiffin
Oil Leaking of TiffinSaam TV
Published On

प्रत्येक व्यक्तीला चमचमीत पदार्थ खायला फार आवडतात. जेवणात जास्त तेल असेल तर पदार्थ आणखी रुचकर लागतात. भाजी किंवा आमटी असे पदार्थ स्टिलच्या डब्ब्यातून घेऊन जाताना तेल सांडतं. अनेकदा अशा पद्धतीने तेल सांडल्याने बॅग खराब होते. तसेच बॅगेत असलेल्या अन्य वस्तू सुद्धा खराब होतात.

Oil  Leaking of Tiffin
Paper Leak In Amravati : एका जागेसाठी 25 लाख रुपयांची मागणी; अमरावती पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती उघड

स्टीलचे डब्बे कितीही घट्ट लावले तरी तेल बाहेर येतंच. त्यामुळे आता अनेक घरांमध्ये स्टिलचे डब्बे वापरणं बंद केलं आहे. त्याऐवजी व्यक्ती प्लास्टीक, टपरवेअर आणि तेल गळणार नाही असे डब्बे वापरतात. या डब्ब्यांतून तेल गळत नाही. मात्र कधी कधी घाईघाईत आपल्याकडे अन्य डब्बे नसतात. त्यामुळे आपण पटकन स्टिलचा डब्बा घेतो. अशावेळी तेल डब्ब्यातून खाली पडूनये यासाठी आम्ही तुम्हाला काही सिंपल टीप्स सांगणार आहोत.

फॉईल पेपर

फॉईल पेपर असा कागद आहे ज्यातून तुम्हालाला तेलगळतीपासून वाचता येईल. त्यासाठी जेव्हा तुम्ही स्टिलचा डब्बा भरता तेव्हा एक फॉईल पेपर घ्या. या फॉईल पेपरला मधोमध चार घड्या करून घ्या. त्यानंतर स्टिलच्या डब्ब्याच्या झाकनावर फॉइल पेपर लावून घ्या. असे केल्याने डब्ब्यातील तेल खाली सांडणार नाही.

रबर

जर तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल तर काय करावे यावर देखील आम्ही उपाय शोधला आहे. जर तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल तर घरामध्ये असलेले १० ते १२ रबब एकत्र घ्या. हे रबर एकत्र जोडून घ्या. एकावर एक रबर जोडल्यावर स्टिलच्या डब्ब्यावर ते झाकनाला घट्ट बांधून घ्या. असे केल्याने देखील भाजीतलं तेल स्टिलच्या डब्ब्यातून बाहेर येणार नाही.

प्लास्टिक

भाजीचं तेल बाहेर येऊनये यासाठी प्लास्टिक सुद्धा उपयुक्त आहे. त्यासाठी आधी प्लास्टीकची फॉईल पेपरसारखी घडी करा आणि डब्ब्यापेक्षा थोडं जास्त गोलाकारा आकारात प्लास्टिक कापून घ्या. ही ट्रिक वापरल्याने सुद्धा तुमच्या डब्ब्यातून तेल बाहेर गळणार नाही.

Oil  Leaking of Tiffin
Sunflower Oil: त्वचेच्या समस्यांवर लाभदायी सूर्यफूलाचे तेल , फायदे वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com