Maharashtra Politics 2024 : डब्बे नसलेल्या इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो; देवेंद्र फडणवीस यांची इंडिया आघाडीवर बोचरी टीका

Lok Sabha Election 2024 : महायुतीचे महानायक नरेंद्र मोदी आहेत आणि समोर 24 पक्षाची आघाडी आहे त्याचे प्रमुख राहुल गांधी आहेत. आपल्या महायुतीच्या ट्रेनमध्ये सर्व घटकांना बसायची सोय आहे. मात्र इंडिया आघाडीकडे फक्त इंजिन असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital

महायुतीचे महानायक नरेंद्र मोदी आहेत आणि समोर 24 पक्षाची आघाडी आहे, त्याचे प्रमुख राहुल गांधी आहेत. आपल्या महायुतीच्या ट्रेनमध्ये सर्व घटकांना बसायची सोय आहे. पण समोरच्या बाजूला सर्वच इंजिन आहेत. त्याठिकाणी बसण्यासाठी सामान्य लोकांना जागा नाही. राहुल गांधीच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी बसू शकतात. आणि इंजिनमध्ये फक्त ड्रायव्हर बसतो, अशी टीका देवेद्र फडणवीस इंडिया आघाडी आणि राहुल गांधी यांच्यावर केली.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना पद्मश्री मिळण्यासाठी मी स्वतः केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. 2014 ला सरकार आल्यानंतर या जिल्ह्यातील विकास कामे केली. नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. सगळं करून टाकलं तर आपल्या मागे येणार कोण अशी मानसिकता राजकार्त्यांची होती. ती आम्ही मोडीत काढल्याचं फडणवीस म्हणाले.

१० वर्षात २५ कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केलं. कोट्यवधी लोकांना घरे दिली. कोट्यवधी होतकरू तरुणांना मुद्रा लोन दिलं. ८० कोटी जनतेला मोफत धान्य दिलं. प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची सोय केली. आता २० लांखांपर्यंत विना तारण कर्ज दिलं जाणार असल्याचं ते म्हणाले.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मत म्हणजे मोदींना मत, भाजप-ठाकरेंवर प्रकाश आंबेडकर कडाडले

विरोधकांकडे बोलण्यासारखं काही नाही, त्यामुळे ते नरेंद्र मोदींवर टीका करतात. पण नरेंद्र मोदींची प्रसिद्धी संपूर्ण जगात आहे. ते ग्लोबल नेते आहेत. त्यांनी अर्थव्यवस्थेला गती दिली आहे. पुढच्या काळात तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी प्रयत्न असेल. त्यामुळे नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं.

Maharashtra Politics 2024
Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com