Manasvi Choudhary
कारले या भाजीचं नुसतं नाव जरी घेतलं तरी अनेकजण नाक मुरडतात.
मात्र कारलं ही भाजी शरीरासाठी फायदेशीर आहे.
कडू कारल्याची आबंट गोड भाजी कशी बनवायची ते पाहूया
सर्वप्रथम कारले स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर त्यातील बिया काढून टाकाव्यात.
यानंतर कारल्याच्या मोठ्या फोडी होतील असे चिरुन घ्यावे.
एका भांड्यात पाणी ठेवून त्यात चिंच टाकून पाणी उकळून घ्यावे. त्या पाण्यात चिरलेले कारले टाकावे. पाच ते सात मिनिटे हे पाणी उकळून घ्यावे.
यानंतर कढईत एक चमचा तेल टाकून त्यात जिरे, हळद, लाल तिखट दोन मिनिटांसाठी छान परतून घ्या.
यानंतर या मिश्रणात उकळलेल्या पाण्यातील कारल्याच्या फोडी टाका. त्यानंतर ही भाजी छान एकजीव करुन घ्या.
अशाप्रकारे तुम्ही ही आंबट- गोड कारल्याची भाजी चपाती, रोटी किंवा भाकरीसोबत खाऊ शकता.