Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनानिमित्त जबरदस्त भाषण; स्टेजवर मुलांसाठी होईल टाळ्यांचा कडकडाट

Republic Day Speech: प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी सोप्या शब्दांत तयार केलेले प्रभावी भाषण. संविधान, लोकशाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आणि राष्ट्रप्रेम यांचा सखोल संदेश.
Republic Day Speech Marathi Easy
Republic Day 2026google
Published On

२६ जानेवारी हा भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा सुवर्ण दिवस मानला जातो. कारण याच दिवशी देशाला स्वातंत्र्य आणि स्वत:चे नियम ठरवण्याचा अधिकार प्राप्त झाला होता. याच दिवशी देश प्रजासत्ताक झाला होता. यालाच अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात हा दिवस साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालयांमध्ये मोठ-मोठे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करुन हा दिवस साजरा केला जातो. त्यामध्ये शिक्षकच नाही तर विद्यार्थीही भाषण देतात. पुढे आपण त्याबद्दल एक खणखणीत आणि सगळ्यांच्याच लक्षात राहील असे सोप्या शब्दात भाषण दिलेले आहे. याचा वापर लहानांपासून मोठ्यांपर्यंत करता येईल.

''आज आपण सर्वजण येथे भारताच्या ७७व्या गणतंत्र दिनानिमित्त एकत्र आलो आहोत. २६ जानेवारी १९५० रोजी भारतात संविधान लागू झाले आणि याच क्षणापासून भारताने नव्या युगात प्रवेश केला. आज भारत प्रजासत्ताक देश म्हणून ७७व्या वर्षात पदार्पण करत आहे. या प्रवासात भारताने अनेक चढ-उतार पाहिले, पण लोकशाहीच्या बळावर आज भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो.

भारताचे संविधान तयार करण्याचे महान कार्य संविधान सभेने केले. या सभेचे नेतृत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आज आपल्याला समान अधिकार, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता मिळाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद यांसारख्या थोर नेत्यांचे मोठे योगदान लाभले. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते.

Republic Day Speech Marathi Easy
कोणती बुलेट देते सगळ्यात जास्त मायलेज? जाणून घ्या Royal Enfield Bullet 350 ची सविस्तर माहिती

हे संविधान तयार करण्यासाठी तब्बल २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान देशाला अर्पण करण्यात आले आणि त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी ते संपूर्ण देशात लागू करण्यात आले. त्यामुळेच २६ जानेवारी हा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

आजच्या दिवशी आपण सर्वांनी संविधानाचे पालन करण्याची, देशाच्या एकतेसाठी काम करण्याची आणि एक जबाबदार नागरिक बनण्याची शपथ घेतली पाहिजे. शिक्षण, संस्कृती, शिस्त आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांवरच भारताचे भविष्य उभे आहे. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे.

माझ्या भाषणाचा शेवट मी एका चारोळीने करतो—

देश आमुचा भारत महान,

तिरंगा आहे आमची शान,

प्रजासत्ताक दिनी गाऊया,

या मातृभूमीचे गोड गान!

वंदे मातरम!...

Republic Day Speech Marathi Easy
Toyota EV: टोयोटाची ऑल-इलेक्ट्रिक Urban Cruiser Ebella लाँच; 543 KM रेंज, 7 एअरबॅग्ज आणि ADAS सेफ्टी बरंच काही, वाचा सविस्तर माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com