Republic Day Quiz 2025: प्रजासत्ताक दिनाविषयी तुम्हाला किती माहिती आहे? 'या' प्रश्नांची उत्तरे देऊन टेस्ट करा तुमचं नॉलेज

Republic Day Quiz Marathi 2025: प्रजासत्ताक दिन हा संविधानाच्या अंमलबजावणीचा आणि देशाला प्रजासत्ताक घोषित केल्याचा वर्धापण दिन म्हणून साजरा करतात. प्रजासत्ताक साजरा करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते.
Republic Day Quiz Marathi 2025
Republic Day Quiz 2025saam tv
Published On

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी भारताला संविधान लागू करण्यात आले होते. म्हणून प्रजासत्ताक दिन हा संविधानाच्या अंमलबजावणीचा आणि देशाला प्रजासत्ताक घोषित केल्याचा वर्धापण दिन म्हणून साजरा करतात. प्रजासत्ताक साजरा करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. या दिवशी अनेक चाळीत, खेड्यापाड्यात विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. त्यात प्रश्न उत्तरांचा खेळ नेहमीच असतो.

यंदा आपण प्रश्नांमध्ये काही बदल करून प्रजासत्ताक दिनाविषयी आपल्याला किती नॉलेज आहे हे पाहणार आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की, प्रजासत्ताक दिनाविषयी सर्व काही माहित आहे, तर तुम्ही पुढील १० प्रश्नांची उत्तरे देऊन तुमचे ज्ञान वाढवू शकता. पुढे आम्ही तुम्हाला काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिली आहेत. त्या उत्तरांना पर्याय सुद्धा दिले आहेत. त्या प्रश्नांचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या भागातला प्रजासत्ताक दिन मोठ्या रंजक पद्धतीने खेळू शकता.

Republic Day Quiz Marathi 2025
Saraswati Pujan 2025: सरस्वती पूजन 2025 मध्ये कधी असेल? 2 फेब्रुवारी की ३, जाणून योग्य तारिख आणि वेळ

१. प्रजासत्ताक दिन कधी आणि का साजरा करतात?

अ) १५ ऑगस्ट, कारण या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले.

ब)२६ नोव्हेंबर, कारण या दिवसाची राज्यघटना लागू झाली.

क) २ ऑक्टोबर, कारण या दिवशी ब्रिटिशांनी भारत सोडला.

ड) २६ जानेवारी, कारण या दिवशी भारताचे संविधान लागू करण्यात आले आणि देशाला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.

उत्तर : - ड) २६ जानेवारी, कारण या दिवशी भारताचे संविधान लागू करण्यात आले आणि देशाला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले.

२. हा कितवा प्रजासत्ताक दिन आहे?

अ) ७५ वा

ब) ७६ वा

क) ७४ वा

ड) ७७ वा

उत्तर :- ७६ वा

३. प्रजासत्ताक दिन कसा साजरा केला जातो?

अ) लाल किल्यावर ध्वज फडकवून...

ब) शांतता आंदोलन करून...

क) परेड, सैन्य प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून...

ड) पंतप्रधानांच्या भाषणाने...

उत्तर :- क) परेड, सैन्य प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून...

Republic Day Quiz Marathi 2025
Health Risks: तुमच्या घरातही प्लास्टिकची भांडी वापरता? होईल कॅन्सरचा धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

४. प्रजासत्ताक दिनी परेड कुठे आयोजित केली जाते?

अ) इंडिया गेट

ब) लाल किल्ला

क) कर्तव्य पथ

ड) राष्ट्रपती भवन

उत्तर :- क) कर्तव्य पथ

५. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींना किती तोफांची सलामी दिली जाते?

अ) ११ तोफांची सलामी

ब) २२ तोफांची सलामी

क) ३१ तोफांची सलामी

ड) २१ तोफांची सलामी

उत्तर :- ड) २१ तोफांची सलामी

Republic Day Quiz Marathi 2025
Healthy Habits: कमी जेवायचं की पोटभर? जाणून घ्या जेवणाची योग्य पद्धत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com