Repair Phone Speaker: फोनचा स्पीकर खराब झालाय का? आता घरच्याघरीच करा दुरूस्त, जाणून 'घ्या' या टिप्स

Repair Phone Speaker Tips And Tricks: अनेक वेळा फोनच्या स्पीकरमध्ये काहीतरी गडबड होते. त्यामुळे फोनचा आवाज नीट येत नाही. तुमच्यापण फोनला असाच प्रॉब्लेम झालाय का? ही समस्या आता तुम्ही स्वत: घरी बसूनही सोडवू शकता. त्याबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊ या.
Repair Phone Speaker: फोनचा स्पीकर खराब झालाय का? आता घरच्याघरीच करा दुरूस्त, जाणून 'घ्या' या टिप्स
Published On

Repair Phone Speaker At Home

आजकाल आपण आपला फोन कॉल करणे, संदेश पाठवणे, व्हिडिओ पाहणे, संगीत ऐकणे आणि इतर अनेक गोष्टींसाठी (Repair Phone Speaker Tips) वापरतो. त्यामुळे फोनचा आवाज बरोबर असणं अत्यंत आवश्यक आहे. पण काही वेळा फोनच्या स्पीकरचा आवाज कमी होतो किंवा खराब होतो. अशा परिस्थितीत फोन वापरणं खूप कठीण होतं. अशीच समस्या जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही घरी बसूनही ती समस्या दूर करू शकता. .(Latest News)

फोनच्या स्पीकरचा आवाज कमी होण्यामागं अनेक कारणं असू शकतात. स्पीकरमध्ये धूळ किंवा घाण जमा झाल्यामुळे किंवा कोणताही इलेक्ट्रॉनिक भाग खराब झाल्यामुळे, स्पीकरला समस्या येऊ शकतात. जर तुमच्या फोनच्या स्पीकरचा आवाज कमी झाला असेल तर तुम्ही काही सोप्या पद्धतींनी तो दूर करू शकता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्पीकर स्वच्छ करा

मोबाइल तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, चांगला आवाज येण्यासाठी फोनचा स्पीकर स्वच्छ करणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या फोनचा स्पीकर साफ करा. यासाठी तुम्ही सॉफ्ट टूथब्रश किंवा स्पीकर क्लीनर वापरू शकता. लक्षात ठेवा की स्पीकरला जास्त घासू नका, यामुळे स्पीकर खराब होऊ (Repair Phone Speaker Tricks) शकतो.

फोन सेटिंग्जमधून आवाज दुरुस्त करा

फोनच्या सेटिंगमुळे स्पीकरलाही समस्या येऊ शकतात. स्पीकर साफ करूनही आवाज चांगला येत नसेल तर फोनचे सेटिंग बदलून पहा. फोन सेटिंग्जवर जा आणि आवाज आणि कंपनवर टॅप करा. येथे तुम्हाला मीडिया, रिंगटोन, अलार्म इत्यादींचा आवाज पूर्णपणे सेट करता येतो. यानंतर फोन सुरू करा आणि किती आवाज येत आहे ते पहा.

Repair Phone Speaker: फोनचा स्पीकर खराब झालाय का? आता घरच्याघरीच करा दुरूस्त, जाणून 'घ्या' या टिप्स
Mobile Charger: Original चार्जर कसा ओळखायचा, कुठे मिळेल माहिती? जाणून घ्या

फोन सेटिंग्ज बदला

याशिवाय फोनमध्ये स्पीकर क्लीनर फीचर उपलब्ध आहे. फोन सेटिंग्जमध्ये जाऊन हा पर्याय सक्रिय (Repair Phone Speaker) करा. हे ऑडिओ चाचणीचं एक साधन आहे. ते सुरू केल्यानंतर स्पीकर मोठ्या आवाजात वाजण्यास सुरुवात करतो. यामुळे स्पीकर स्वच्छ होण्यास मदत होते.

सॉफ्टवेअर अपडेट करा

अनेक वेळा सॉफ्टवेअर अपडेट न केल्यानेही स्पीकरमध्ये समस्या निर्माण होतात. त्यामुळे सॉफ्टवेअर वेळेवर अपडेट करा, यामुळे फोनच्या अनेक समस्या दूर होतात. या सर्व पद्धतींनी फोनचा स्पीकर ठीक होत नसेल, तर फोन मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात न्यावा लागेल.

Repair Phone Speaker: फोनचा स्पीकर खराब झालाय का? आता घरच्याघरीच करा दुरूस्त, जाणून 'घ्या' या टिप्स
Mobile Theft : दुचाकीवरुन येत मोबाईल चोरी; चोरटे पोलिसांच्या ताब्यात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com