Mobile Charger: Original चार्जर कसा ओळखायचा, कुठे मिळेल माहिती? जाणून घ्या

Mobile Charger News:स्मार्टफोनसाठी चार्जर हा आवश्यक भाग आहे. आजकाल बाजारात अनेक चार्जर उपलब्ध आहेत, त्यातील काही अस्सल आहेत तर काही बनावट. बनावट चार्जर वापरल्याने फोनची बॅटरी खराब होऊ शकते आणि फोनही लवकर खराब होऊ शकतो.
Mobile Charger
Mobile ChargerSaam Digital
Published On

Mobile Charger

स्मार्टफोनसाठी चार्जर हा आवश्यक भाग आहे. आजकाल बाजारात अनेक चार्जर उपलब्ध आहेत, त्यातील काही अस्सल आहेत तर काही बनावट. बनावट चार्जर वापरल्याने फोनची बॅटरी खराब होऊ शकते आणि फोनही लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे चार्जर खरेदी करताना तो खरा असल्याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे.

बऱ्याचवेळा स्वस्त मिळतोय म्हणून लोक बनावट चार्जर खरेदी करतात, ज्यामुळे त्यांना नंतर समस्यांना सामोरं जावं लागतं. बनावट चार्जरमुळे स्मार्टफोनचंही नुकसान होऊ शकतं. तसंच बनावट चार्जरमुळे स्मार्टफोनच्या बॅटरीचे देखील सर्वाधिक नुकसान होते.

चार्जर खरेदी कताना कोणत्या गोष्टींची माहिती आवश्यक

डिझाईन: बनावट चार्जरपेक्षा ब्रँडेड कंपन्यांच्या चार्जरची रचना नेहमीच चांगली असते. सर्व कनेक्टर आणि पोर्ट मूळ चार्जरमध्ये पूर्णपणे फिट होतात. बनावट चार्जरचे अनेकदा कनेक्टर आणि पोर्ट सैल असतात.

ब्रँडचं नावं: खऱ्या चार्जरवरील ब्रँडचं नाव नेहमीच बरोबर असतं. बनावट चार्जरवरील ब्रँडचं नाव चुकीचं असू शकतं किंवा त्याच्या नावात थोडाफार बदल केला जाऊ शकतो.

सील: मूळ चार्जरवर नेहमीच सील असते. बनावट चार्जरवर कोणतेही सील नाही किंवा सील तुटलेले असते.

वजन: बनावट चार्जरपेक्षा Original चार्जरचे वजन जास्त असते.

वीज वापर: Original चार्जर कमी वीज वापरतो. बनावट चार्जरला जास्त वीज लागते.

फोनचा चार्जिंग स्पीड: मूळ चार्जरमुळे मोबाईल जलद चार्ज होतो, तर बनावट चार्जरचं चार्जिंग स्पीड खूप कमी असते.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mobile Charger
Maharashtra Politics: 'आरक्षण देण्याचे अनेक मार्ग, पण सरकार..., मराठा आरक्षणावरून अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

या टिप्स फॉलो करा

वास्तविक चार्जर खरेदी करताना नेहमी विश्वासार्ह दुकानातून खरेदी करा. चार्जर ऑनलाइन खरेदी करताना सावधगिरी बाळगा आणि विश्वासार्ह वेबसाइटवरूनच खरेदी करा. मॉडेल नंबर देखील तपासा. मूळ चार्जरवर नेहमी मॉडेल क्रमांक लिहिलेला असतो. चार्जरची वॉरंटी तपासा. मूळ चार्जरवर नेहमीच वॉरंटी कार्ड असते. चार्जरची किंमत तपासा कारण खऱ्या चार्जरची किंमत बनावट चार्जरपेक्षा जास्त असते.

Mobile Charger
Ayodhya Ram Mandir: महर्षी वाल्मिकी नसते तर रामायण आपल्यापर्यंत पोहोचलं नसतं, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com