Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेचं धार्मिक महत्त्व नेमकं काय? 'या' पद्धतीनं करा शुभमुहूर्तावर पूजा

Akshaya Tritiya 2024: देशभरात उद्या दिनांक १० मे रोजी देशभरात अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मूहूर्त समजला जातो.
Akshaya Tritiya
Akshaya TritiyaYandex

देशभरात उद्या दिनांक १० मे रोजी देशभरात अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मूहूर्त समजला जातो. हा खास दिवस अनेक व्यक्ती हे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना अर्पण करतात. त्यामुळे असे मानले जाते की, अक्षय्य तृतीयाच्या दिवश देवी लक्ष्मीच्या उपासनेसाठी सर्वोत्तम दिवस(Day) मानला जातो,असे केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात.

Akshaya Tritiya
Lifestyle To Prevent Cancer: कर्करोग टाळाण्यासाठी जीवनशैलीत करा 'हे' छोटे बदल

अक्षय्य तृतीया हा सण अनेक सणांपैकी महत्त्वाचा सण मानला जातो.या सणाला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. हा दिवस वैशाख महिन्यातील शुल्क पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा करण्याची परंपरा आहे.या दिवशी घरात नवीन वस्तू खरेदी केल्याने लाभ होतो तसेच घरात भरभराट होते असे मानले जाते. त्यामुळे अनेक व्यक्ती अक्षय्य(Akshaya) तृतीयाच्या दिवशी सोने-चांदी किंवा अनेक नवीन वस्तूची खरेदी करत असतात.

पुजेची सर्वोत्तम वेळ

अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने अनेक घरोघरी पूजाही केली जाते. अक्षय्य तृतीयाच्या दिवशी घरात पूजा केल्याने घरात सुख-शांती लाभते शिवाय अनेक सकारात्मक गोष्टी घरात नांदतात. त्यामुळे या दिवशी घरात पूजा करावी. पंरतु उद्या पूजा करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती ते आपण जाणून घेऊयात. अक्षय्य तृतीयाच्या दिवशी पूजा करण्यासाठी सकाळचा वेळ अगदी योग्य आहे. तो म्हणजे पहाटे ५.१५ वाजल्यापासून ते सकाळी ११.४३ पर्यंत. हा वेळ अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने पूजा करण्यासाठी महत्त्वाचा आणि योग्य मानला जाणार आहे.

पूजेच्या पद्धती

१.पहिल्यांदा सकाळी लवकर उठून घरात असलेल्या देव्हाऱ्याची योग्य पद्धतीने स्वच्छता करावी.

२.त्यानंतर एका पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचा कापड पसरवा.

३.पाटावर कपडा पसरवल्यानंतर त्यावर लक्ष्मी आणि भगवान विष्णू आणि गणेश तसेच कुबेर देव यांच्या व्यवस्थिक मूर्ती ठेवा.

४.त्यानंतर या प्रत्येक मूर्ती गंगाजलाने स्वच्छ कराव्यात.

५.मग त्यांना कुंकू आणि चंदन लावावे शिवाय नंतर फूल, दुर्वा, सुपारी, सुपारी, नारळ इत्यादी अर्पण करावे.

६.शेवटी विष्णु नामावली, कुबेर चालीसा आणि गणेश चालीसा पाठ करावे.मग आरती करून पूजेची सांगता करावी.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Akshaya Tritiya
Healthy Lifestyle: 'या' सिंपल टिप्सने आयुष्यभर शरीर राहील तरुण आणि तंदुरुस्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com