Akshaya Tritiya 2024 : दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार अक्षय्य तृतीया यावर्षी १० मे रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष पूजा केली जाते. या दिवशी सोने खरेदी करणे देखील शुभ असते. जे लोक या दिवशी सोने खरेदी करून घरी आणतात त्यांना पैशाशी संबंधित समस्या येत नाहीत. त्यांच्या घरातही सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गजकेसरी योग जुळून येत आहे. यावेळी गजकेसरी योग अनेक राशींसाठी शुभ असू शकतो. त्यांना अमाप संपत्तीही मिळू शकते. या काळात ३ राशी मालामाल होऊ शकतील.
मेष
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मेष राशीच्या लोकांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. या काळात काहीजण मालमत्ता खरेदी करू शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुंडलीतही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
वृषभ
अक्षय्य तृतीयेचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी आनंदाची मिळेल. यावेळी तुमचे नशीब तुम्हाला प्रत्येक कामात साथ देईल, ज्यामुळे तुम्हाला जीवनात यश मिळू शकते. नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकते.
मीन
या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ पुढील महिन्यात मिळू शकतं. जे लोक परदेशात सहलीला जाण्याचा विचार करत आहेत त्यांचे स्वप्न पुढील महिन्यात पूर्ण होऊ शकते. या राशीतील काही लोकांना प्रवास योग संभावत आहे. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना चांगला नफा मिळू शकतो.
टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.