Parenting Tips : बालपणात तुमच्या मुलांनाही 'या' गोष्टींचा सामना करावा लागतोय? मोठे झाल्यावरही राहतील डरपोक

Relationships Tips : काही पालक मुलांचे पालनपोषण व्यवस्थित करत नाहीत. त्यामुळे मुलांच्या आरोग्यासह मनावर याता वाईट परिणाम होतो. अशी मुलं मोठी झाली तरी कायम डरपोक राहतात.
Relationships Tips
Parenting TipsSaam TV

लहान मुलांचं संगोपन व्यवस्थित होणं गरजेचं असतं. कारण लहान मुल म्हणजे एक कोरी पाटी, त्यांच्यावर आपण जे संस्कार करू ते संस्कार मुलं आत्मसात करतात. अशात काही पालक मुलांचे पालनपोषण व्यवस्थित करत नाहीत. त्यामुळे मुलांच्या आरोग्यासह मनावर याता वाईट परिणाम होतो. अशी मुलं मोठी झाली तरी कायम डरपोक राहतात.

पालकांचं टेन्शन

काही घरांमध्ये पालकांना संपत्ती किंवा आरोग्याच्या समस्या देखील जाणवतात. त्यामुळे पालक कायम चिंतेत असतात. घरात हालाखीची परिस्थिती, आर्थिक समस्या, आजारपण अशा विविध कारणांमुळे घरात सतत नैराष्य राहते. अशा वातावरणात मुलांवर त्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे मुलं भित्री होतात.

Relationships Tips
INDIA Alliance PM Face: इंडिया आघाडीचा पंतप्रधान कोण? राहुल गांधींसह 7 जणांच्या नावाची चर्चा

कमी संवाद

अनेक घरांमध्ये मुलांचे पालक घरात नसतात. नोकरी किंवा कामानिमित्त सतत बाहेर राहतात. अशात कोवळ्या वयात मुलांना येणाऱ्या अडचणी किंवा आव्हाने त्यांना आपल्या पालकांना सांगता येत नाही. पालकांना आपल्या मुलांचं म्हणणं ऐकण्यासाठी वेळ नसतो. अशावेळी मुलं आपले दु:ख पालकांना न सांगता बाहेरच्या अन्य व्यक्तीला सांगतात आणि आणखी मोठ्या अडचणीत फसतात.

वाईट अनुभव

बालपणात प्रत्येक मुलाला वाईट अनुभव येत नाही. काही ठरावीक लहान मुलं विविध समस्याचे शिकारी बनतात. पाण्यात पोहताना त्यात बुडणे, आगीच्या विळख्यात सापडणे या आणि अनेक विचित्र गोष्टी काही मुलांच्या आयुष्यात लहानपणीच घडतात. त्यामुळे तेव्हापासून त्यांच्या मनात असलेली भीती ते कितीही मोठे झाले तरी कमी होत नाही.

पाळणाघरात संगोपन

काही मुलांचं संगोपन पाळना घरात होतं. त्यांचे आई-वडील त्यांच्या सोबत नसतात. येथे त्यांना सर्व सुख सोयी मिळतात, काळजी घेतली जाते. मात्र त्यांना बालपणी आईच्या प्रेमाची आणि मायेची उब मिळत नाही. त्यामुळे अशा मुलांच्या मानसिकतेवर देखील याचा परिणाम होतो.

Relationships Tips
Baby Girl Name List : गंगा नदीच्या नावावरून ठेवा तुमच्या चिमुकल्या मुलीचे नाव; जाणून घ्या अर्थ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com